I,MeMyself

I,MeMyself

Thursday, December 1, 2011

मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...


हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

हिचा हात घट्ठ हातात पाहीला जरा धरुन
तुझ्या माझ्या सार्याी जागा पाहिल्या पुन्हा फिरुन
विसर विसर विसरताना पाहिल तुला स्मरुन
तु होतीस, नव्हतीस पण हिच हासणं होत
तुझं नसणं आणि हिच असणं होत
खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं च फसणं होतं
हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

असे तसे कसे तरी जगतात काही जण
तसं हिला जरा जरा कळतं माझं मन
संध्याकाळी गप्प होतो हे ही हिला कळलं
तुझी बाजू घेउन हिने खुप मला छळलं
खरंच मला ठाऊक नाही हिच जुनं काही
कुणास ठाऊक का, मी विचारलं ही नाही
आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं-बुरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

तुझ्यासारखा आता मि कारण नसता हसतो
कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो
तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं
माझ्याआधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळतं
ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खुप
भळभळणार्याा जखमेवरती हे असं साजूक तूप
जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पूर
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

- सौमित्र उर्फ किशोर कदम

Wednesday, November 30, 2011

तुझ्या आठवणीतले काही क्षण



तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या साठी निवळ अविस्मरणीय आहे.म्हणूनच हे क्षण आता जतन करून ठेवलेत.


शिवनेरी आणि माझा गावाची सफर.


तशी पहिली तर हि आमची पहिली आणि आता पर्यंतची शेवटची सफर.आम्ही तसे खूप इच्छा असं सुधा कमी भटकणारे.हि सफर सुधा योगायोगानेच झाली.तेव्हा आम्ही engineering च्या दुसऱ्या वर्षाला होतो.
सफर होती ४ दिवसांची buget  ५०० इच . कॅमेरा समाधान ने आणला होता कोणाचा तरी रोले वाला.
हे पहतो त्याचेच आहेत develope करण्याचे पैसे सुधा काढले होते हा अल्बम मी स्कॅन केला.



मी आणि समा शिवान्रेरी वर


गड चढताना 

मंदिरा पासून जरा पुढे गुफेन जवळ