I,MeMyself

I,MeMyself

Saturday, April 27, 2013

लगीन आमच्या दीदीच……

लगीन आमच्या दीदीच……




कुर्यात सदा मंगलम…………… 



        !!  श्री गणेशाय नम:  !! 

!!!  विवाहबंधन  !!!


   
       मंगळवार दि २८ मे २०१३



         चि.   महेश


          चि   सौ   का . अश्विनी




निमंत्रक : राहुल  , समाधान , अपर्णा

!!!    आपणास आग्रहाच निमंत्रण !!!


विवाहस्थळ :
रायचनद भोजराज  हॉल
विठ्ठल मंदिरा जवळ
मसूर , कराड ,सातारा

    

Thursday, April 18, 2013

राजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सुअंभ पर ।
रावण सदंभ पर
रघुकुल राज है ॥

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है ॥

ह्र्दयात माऊली
रयतेस सावली ।
गडकोट राऊळी
शिवशंकर हा ॥

मुक्तीची मंत्रणा
युक्तीची यंत्रणा ।
खल दुष्ट दुर्जना
प्रलयंकर हा ॥

सुष्टांसी रक्षितो
शत्रू विखंडतो ।
भावंड भावना
संस्थापितो ॥

ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥

दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है ॥

तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥

॥ जय भवानी, जय भवानी ॥

॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

॥ जय भवानी, जय शिवाजी ॥
आपल्यासाठी दुसर्‍याच्या डोळ्यात आलेले अश्रु पाहण्यात अपूर्व आनंद असतो. नुसता आनंदच नाही मोठा धीर असतो त्या अश्रुत. - ययाति
पुन्हा बेफिकीरीने आयुष्य बघणे...
पुन्हा त्याच गोष्टी आठवित राहणे...
पुन्हा शुन्यातून जग बांधणे...
पुन्हा नव्याने तेच जुनेच जगणे...
पुन्हा त्याच चक्रात गुंतून जाणे...
पुन्हा ठरवणे, 'पुन्हा हे न होणे'...

सह्याद्री मध्ये भरपूर अश्या जागा आहेत जिथे मला "जगायचं" असतं आणि मी तसा जातोही .........पण काही ठराविक जागा आहेत जिथे मला मरायचंय.....

मैत्री मैत्री मैत्री


मैत्री

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेले प्रेम ..
शब्दात व्यक्त करता येणार नाही ..
असे केव्हा झाले ..
असे का झाले ,.कसे झाले ..
करणे देता येणार नाही ..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेला विश्वास ..
कधी आपल्याला जवळ घेऊन आला ..
कळलेच नाही..
कधी आपण एकमेकांचे झालो..
समजलच नाही..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेली जवळीक ..
ती हृदयांची देवाण घेवाण
असले तरी काही बोललो नाही..
पण एकमेकांच्या हृदयला जपणे
ते कधी सोडले नाही..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेले गोड नाते..
एकमेकांना विसरू ..
या जन्मी तरी शक्य नाही..
कुठ पर्यंत साथ असू
हे तर माहित नाही..
न कसली अट ..न कसले वचन..
फक्त तुजे माजे प्रेम..
एकच अनोखे बंधन .♥♥♥

आमचे नाते रक्ताचे नाही पण त्याहुनी घट्ट आहे....

इतकेच मला जातांना !!!


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
-सुरेश भट ( एल्गार )

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!


मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत
होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत
होते?
कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव
आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत
होते!
असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले
मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून
काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत
होते!
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास
गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!
मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले
मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्या हवेत
होते!
- सुरेश भट ( झंझावात )