– किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, “किल्ले आहेत म्हणुन तेथे
जावं.” पण त्याहीपेक्षा महत्वाचं
म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-
अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं
अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य
आहे. पण
तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी.
नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज,
माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन
ओहोरलेली टाकी. पण हीच ती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र
ताठ मानेने वावरले आहेत.
जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने
आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे
आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन
आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण
त्याची किंमत..? अर भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं
गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय
जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह
अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क
आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य
त्या सत्तांध – धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले
होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये
ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच. पण
महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले
भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रं
आहेत.
ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत.
आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत.
अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे
युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले
गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे
किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने
त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर
होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले
ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत
व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे
मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले.
काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण
घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे
इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !
- साद सह्याद्रीची… भटकंती किल्ल्यांची —
श्री. प्र. के. घाणेकर