The God Delusion
I,MeMyself
Sunday, February 28, 2021
Tuesday, January 26, 2021
निर्धार
१४ जानेवारी १७६१ काशीराजाच्या नजरेतून:समारोप
निर्धार !
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्घट चढलेले !
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले !
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा !
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !
“हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !
“त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !
– कविवर्य कुसुमाग्रज
पुष्प पहिले:- कलीपुरुष नजीब
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2982588445361023
पुष्प दुसरे:- पेला आता काठोकाठ भरला आहे, आता अजून एक थेंबही त्यात मावणार नाही:काळरात्रीचे पडघम
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2982815635338304
पुष्प तिसरे:- संगरतांडव
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2983472488605952
पुष्प चौथे:- प्रलय
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2984130981873436
पुष्प पाचवे , भाग १:- काळपुरुषाचे दु:ख
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2985989461687588
पुष्प पाचवे , भाग २:- काळपुरुषाचे दु:ख
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2986178411668693
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे
Subscribe to:
Posts (Atom)