I,MeMyself

I,MeMyself

Sunday, May 12, 2013

~ : लगीन आमच्या दीदीच…… :~

दिदि म्हणजे (अश्विनी  घोलप ) माझी आवडती बहिण.

हिच्या लग्नाचा सोहळा २८ मे ला आहे. तयारी जवळजवळ दोन महिने चालू आहे. 
तिला हवा तसा नवरा मिळाल्याचा आनंद तिच्या चेहेर्यावर लगेच कळून येतो. अगदी लग्न ठरल्या पासून हि रोज काही न काही गात असते पुटपुटत असते. 

ती घरातून जाणार हेच कधी पटत नाही. काही तरी हरवल्या सारखा वाटत राहत. आमच्या घरातला अगदी प्राण आहे. घरात असल्यावर काही ना  काही तरी विचारात असते नाही तर कोणाला तरी उपदेश देत असते. 
तिला मी चोच्या म्हणतो आणि समाधान चांभार. कोणत्या हि गोष्टीत तिला उपदेश करायला जमत.

तिला दीदी बोलतो कारण ती खूप समजूतदार आहे. बरीच हट्टी पण.


Saturday, April 27, 2013

लगीन आमच्या दीदीच……

लगीन आमच्या दीदीच……




कुर्यात सदा मंगलम…………… 



        !!  श्री गणेशाय नम:  !! 

!!!  विवाहबंधन  !!!


   
       मंगळवार दि २८ मे २०१३



         चि.   महेश


          चि   सौ   का . अश्विनी




निमंत्रक : राहुल  , समाधान , अपर्णा

!!!    आपणास आग्रहाच निमंत्रण !!!


विवाहस्थळ :
रायचनद भोजराज  हॉल
विठ्ठल मंदिरा जवळ
मसूर , कराड ,सातारा

    

Thursday, April 18, 2013

राजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सुअंभ पर ।
रावण सदंभ पर
रघुकुल राज है ॥

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है ॥

ह्र्दयात माऊली
रयतेस सावली ।
गडकोट राऊळी
शिवशंकर हा ॥

मुक्तीची मंत्रणा
युक्तीची यंत्रणा ।
खल दुष्ट दुर्जना
प्रलयंकर हा ॥

सुष्टांसी रक्षितो
शत्रू विखंडतो ।
भावंड भावना
संस्थापितो ॥

ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥

दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है ॥

तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥

॥ जय भवानी, जय भवानी ॥

॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

॥ जय भवानी, जय शिवाजी ॥
आपल्यासाठी दुसर्‍याच्या डोळ्यात आलेले अश्रु पाहण्यात अपूर्व आनंद असतो. नुसता आनंदच नाही मोठा धीर असतो त्या अश्रुत. - ययाति
पुन्हा बेफिकीरीने आयुष्य बघणे...
पुन्हा त्याच गोष्टी आठवित राहणे...
पुन्हा शुन्यातून जग बांधणे...
पुन्हा नव्याने तेच जुनेच जगणे...
पुन्हा त्याच चक्रात गुंतून जाणे...
पुन्हा ठरवणे, 'पुन्हा हे न होणे'...

सह्याद्री मध्ये भरपूर अश्या जागा आहेत जिथे मला "जगायचं" असतं आणि मी तसा जातोही .........पण काही ठराविक जागा आहेत जिथे मला मरायचंय.....

मैत्री मैत्री मैत्री


मैत्री

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेले प्रेम ..
शब्दात व्यक्त करता येणार नाही ..
असे केव्हा झाले ..
असे का झाले ,.कसे झाले ..
करणे देता येणार नाही ..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेला विश्वास ..
कधी आपल्याला जवळ घेऊन आला ..
कळलेच नाही..
कधी आपण एकमेकांचे झालो..
समजलच नाही..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेली जवळीक ..
ती हृदयांची देवाण घेवाण
असले तरी काही बोललो नाही..
पण एकमेकांच्या हृदयला जपणे
ते कधी सोडले नाही..

तुजी माझी मैत्री आणि त्यातून
निर्माण झालेले गोड नाते..
एकमेकांना विसरू ..
या जन्मी तरी शक्य नाही..
कुठ पर्यंत साथ असू
हे तर माहित नाही..
न कसली अट ..न कसले वचन..
फक्त तुजे माजे प्रेम..
एकच अनोखे बंधन .♥♥♥

आमचे नाते रक्ताचे नाही पण त्याहुनी घट्ट आहे....