I,MeMyself

I,MeMyself

Wednesday, March 7, 2012

होय, मी मराठी आहे…


होय, मी मराठी आहे…

१.कारण आजही आमच्या धमन्यांत महाराजांचे रक्त खेळते.
२.कारण भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

३.कारण खोखो, कबड्डी हे एकमेकांना आयुष्यातून ‘उठवायचे‘ आणि एकमेकांच्या ‘तंगड्या‘ ओढायचे मराठी खेळ आम्हाला अतिप्रिय आहेत.
४.कारण भारतातल्या सर्वश्रेष्ठ अशा फुले-शाहू-आंबेडकर, कर्वे, प्रबोधनकार, गाडगेमहाराज या समाजसुधारकांचा वारसा आम्हाला आहे.

५. कारण सी डी देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकल्याचा इतिहास आम्हाला तोंडपाठ आहे.
६. कारण कुणीही कितीही म्हटले तरी राजमुळे भय्या लोक ‘चड्डी’ मध्ये राहायला लागले हे आम्हाला पटते.
७. कारण बेळगावला कन्नडिगांनी धिंगाणा घातला तरी आम्ही इथे त्यांना हाणत नाही.
८. कारण कविता राऊतपासून वीरधवल खाडेपर्यंत आम्हाला सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे.
९. कारण अटकेपार (हे आता कुठे आहे हे माहीत नसले तरी ) झेंडे रोवल्याचा आम्हाला अभिमान आहे.
१०. कारण मराठी नीट लिहिता येत नसली तरी मराठी पंचलाईन असलेले टी-शर्ट घालून अभिमानाने फिरतो.

११. कारण कितीही अशक्य वाटत असले तरी कधीतरी पवारकाका पंतप्रधान बनणार असे आम्हाला उगीचच  वाटते.
१२. कारण आम्ही आमची स्वत:ची बायको सोडली तर कुणाच्या बापाला घाबरत नाही.
१३. कारण आम्ही आता हिंदी वृत्तवाहिन्या फारशा बघत नाही. राजच्या वेळी त्यांनी दाखवलेला पक्षपातीपणा आणि माजोरडेपणा आम्ही अजून विसरलेलो नाही.
१४. कारण कुणीही जिंकले नाही तरी आयपीएलमध्ये आमचे दोन संघ असल्याचे आम्हाला समाधान वाटते.
१५. कारण राखी सावंत मराठी आहे याचा आम्हाला प्रचंड राग येतो.

१६. कारण ‘मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला’ असे भिक्कार वाक्य ठाकरेआजोबा लिहिणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.
१७. कारण आम्हाला सह्याद्रीच्या कड्याकपारीत ट्रेकिंगला जायला आवडते.
१८. कारण पाऊस आला की आम्ही ‘गारवा’च ऐकतो.

१९. कारण सचिन ‘मलिंगा’चा भक्त असल्याची आम्हाला लाज वाटते.
२०. कारण अबू असीम आझमीला बघितले की आमच्या तोंडात शिव्या येतात.
२१. कारण मराठी साहित्य संमेलनात होणारी भांडणे बघून काय होणार या हरामखोरांचे (मराठीचे नव्हे ) असा आम्ही विचार करतो.
२२. कारण बॉम्बेला मुंबई म्हणायला आम्हाला आवडते.
२३. कारण ‘अय्या, माधुरी किती छान मराठी बोलते’ हे वाक्य आम्हाला माधुरीपेक्षा जास्त सुंदर वाटते.

२४. कारण आम्हाला फुकाची संस्कृती शिकवणारे आमचे मराठी कलाकारसुद्धा तर्राट होऊन धिंगाणा घालू शकतात हे आम्ही बघितलेले आहे.
२५. कारण संदीप वासलेकर हे कोण आहेत हे आम्हाला अजून माहित नाही.
२६. कारण पु. ल. देशपांडे हे एकच श्रेष्ठ लेखक होऊन गेले असे आम्ही मानतो.
२७. कारण ‘आयचा घो’  या वाक्यप्रचाराला आम्ही शिवी मानत नाही.
२८. कारण इकडे डरकाळ्या फोडणारे हिंदीभाषिक दक्षिणेत सुतासारखे सरळ कसे असतात हे आम्हाला अजून कळत नाही.
२९. कारण ‘महागुरू’ कितीही डोक्यात गेला तरी आम्ही ‘एकापेक्षा एक’ बघतो.
३०. कारण आम्हाला हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यापेक्षा ‘झी गौरव’ सोहळा आवडतो.
३१. कारण सारेगामा कार्यक्रम कितीही ताणला तरी आम्ही तो बघतो.
३२. कारण आमचा मकरंद अनासपुरे भविष्यात रजनीकांतला टक्कर देईल असे आम्हाला वाटते.
३३. कारण हिंदी चित्रपटात कितीही दुय्यम भूमिका केल्या तरी मराठी कलाकारच श्रेष्ठ असतात हेच सत्य आहे असे आम्ही मानतो.

३४. कारण आम्हाला मराठीचे संवर्धन करा असे बेंबीच्या देठापासून बोंबलणाऱ्या सगळ्या साहित्यिकांची सगळीच पोरे अमेरिकेत कशी, असा प्रश्न आम्हाला पडतो.
३५. कारण आमच्या सचिनला कुणी शिव्या घातल्या की आम्ही त्याची आईबहीण काढतो.
३६. कारण पानिपतची लढाई आजपण आम्हाला स्फुरण चढवते.
३७. कारण आमचा लाडका लक्ष्या गेलाय यावर आमचा अजून विश्वास बसत नाही.
३८. कारण ‘शाळा’ पुस्तक वाचले की आम्ही शाळेत केलेल्या गमतीजमतीत हरवून जातो.
३९. कारण ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट ‘थ्री इडीयट’पेक्षा चांगला चित्रपट आहे असे आमचे मत आहे.
४०. कारण आम्हाला ऊसाचा रस कोल्ड्रिंकपेक्षा जास्त भावतो.
४१. कारण राजकारणात कुठलाही भूकंप झाला की यामागे पवारकाकांचा हात आहे असे आम्हाला वाटते.
४२. कारण बाबासाहेब पुरंदरे या माणसाला शिवाजी महाराजांपेक्षा जास्त इतिहास माहीत आहे असे आम्हाला उगीच वाटते.
४३. कारण ‘झलक दिखलाजा, एक बार आजा आजा‘ हे गाणे शेतकरी आणि पाऊस या दोघांमधला संवाद आहे असे आम्ही समजतो.
४४. कारण कुठल्या शहरातली मिसळ चांगली यावर आम्ही कितीही वाद घातले तरी मिसळ ही सर्वश्रेष्ठ आहे यावर आमचे एकमत आहे.
४५. कारण आम्ही आमच्या पोरांना इंग्रजी माध्यमात नक्की कशासाठी शिकवतो याचे कारण आम्हाला अजून सापडलेले नाही.
४६. कारण स्वस्थ बसवत नाही म्हणून कशाला तरी उगीच कारण नसताना दुसऱ्या मराठी माणसाची खोडी काढायची ही आमची जुनी सवय आहे.
४७. कारण फुटकळ मराठी चित्रपट बघण्यापेक्षा ‘दर्जेदार’ नाटके बघायला जास्त आवडते.
४८. कारण आम्ही ‘बसलो’ की आमच्यावर अन्याय कसा होतो याचाच पाढा वाचत बसतो.
४९. कारण आता महाराष्ट्राचा बिहार होतोय आणि बिहारचा महाराष्ट्र होतोय असे आम्हाला वाटायला लागलंय.
५०. कारण आम्हाला शरम वाटते की आमच्या राज्यकर्त्यांना (महाराष्ट्राला ५१ वर्षे झाली तरी) अजून विकासाचे राजकारण करावे याची अक्कल आलेली नाही.

५१. कारण महाराष्ट्र दिन आम्ही पिकनिकमध्ये ‘सत्कारणी’ घालवतो.

No comments:

Post a Comment