I,MeMyself

I,MeMyself

Wednesday, July 25, 2012

कारगीलचे युद्ध २६ जुलै १९९९

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बके निशाँ होगा !!!


कारगीलचे युद्ध २६ जुलै १९९९
कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.१९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होतेया युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिलीत्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणताततसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धातयुद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हतीउलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता
पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.१९९९ च्या उन्हाळ्यातपाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झालेही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होतीअनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. 
हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहेयात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळालाहे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होतेपरंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवलेत्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले
म्हणूनचभारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलटसैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणलाया युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केलीतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली.परिणामीकाही महिन्यांतच (ऑक्टोबर.१९९९ मध्येपाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. 
स्थळ
 .१९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाहीतरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत.सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात.१९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.१९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले
हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असेकाही काळानंतर पाकिस्तानी सैनिक,अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागलेपाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केलाकारगीच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला.१९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेलेपरंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वतलाहोरला जाऊन आले होते
.१९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलेया कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचेअसे केले कीमहामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता
भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले कीलडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होतातसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होताभारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता
घटनाक्रम
 
पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा
 
कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणूनअतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळतहवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असे.
फेब्रुवारी.१९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभलेपाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडलीयांतच भर म्हणजेभारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली
स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्यातसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्यारिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्यासाधारणपणे,अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्यापाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीनकाश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.
भारतीयांना उशीराने मिळालेली खबर

सुरुवातीलाअनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झालामुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झालीभारतीय लष्कराच्या मतेहा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतोत्यात नवे काही नाही.पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केलामेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली
त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवलीतिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झालेसुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटलेपरंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आलेघुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आलेअशा रितीने कारगील येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झालेपाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होतातर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.
भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजयया नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केलीत्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आलापरंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हतेत्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होतीअर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली.. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगीलच्या युद्धात वापरलेघुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होतीयांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.
भारतीय वायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागरसुरू झालेया ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावलीमोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळभौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.
भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केलीकराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आलेया कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेलीकाही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.
भारतीय प्रत्युत्तर

कारगीलचे युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले.भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्‍न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आलाप्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व देण्यात आलेअसे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.
घुसखोरांनीआधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्याबंदुकास्वयंचलित मशीन गनछोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्यातसेचचौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होतायातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केलेया चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते
पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होतीवर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आलेहा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आलाया चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेलाजसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रितीने होत गेले.
महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होतीयानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आलेयातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हतेपॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). 
४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होतेपॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागलेयाच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागलीजरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंततोफखान्याचा भडिमार चालूच होता.
भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखलेतोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जातेअनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावलेतोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले
टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतातटायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झालेपाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावलेसरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आलीया लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.
या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केलाकाही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्याकाही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या
बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती.त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होतेपरंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्यातसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या
या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होतेपरंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होतेजर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हतेजर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतराष्ट्रीय सहानूभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.
भारताने इ.१९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या
पाकिस्तानची
 दगाबाजी 
सुरूच आहे७१च्या युद्धात भारताच्या बहाद्दर सैनिकांनी पाकिस्तानचा दारुण पराभव केलापाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह ९३ हजार सैनिकांनीहिंदुस्थानसमोर गुडघे टेकून शरणागती पत्करलीत्यावेळी पाकिस्तानच्या विनंतीनुसार हिंदुस्थानच्या ‘दयाळू सरकारने तत्काळ सर्व पाकिस्तानीसैनिकांची सुटका केलीपण याच युद्धाच्या वेळी पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या केवळ ५४ हिंदुस्थानी युद्धकैद्यांना मात्र पाकिस्तानने सोडलेनाही. ‘शांती का पैगाम म्हणून फेब्रुवारी १९९९ मध्ये हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानात जाऊन ‘लाहोर करार केलात्यानंतर चारच महिन्यांनीपाकिस्तानने कारगीलचे युद्ध लादून हिंदुस्थानचे पांग फेडले. ‘शेजार्‍याचा कळवळा म्हणून लाहोर बससमझोता एक्स्प्रेस सुरू केली तेव्हा यागाड्यांतून बनावट नोटा पाठवून हिंदुस्थानची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पाकड्यांनी केला२००१ मध्ये आग्र्यात जनपरवेजमुशर्रफ यांच्यासोबत शिखर परिषद झाली आणि चारच महिन्यांनी पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या संसदेवरच हल्ला चढवला.पाकिस्तानने हिंदुस्थानशी केलेल्या दगाबाजीचा हा काळाकुट्ट इतिहास आहेमात्र त्यापासून कोणताही धडा  घेता हिंदुस्थानी राज्यकर्ते पुनपुन्हापाकिस्तानशी ‘शांतता बोलणी करण्याची भंपकबाजी करायला तयार होतातहेच देशाचे दुर्दैव आहेपाकिस्तानला शांततेची भाषा समजते असेसमजणे म्हणजे बकवास आहेपुन्हा ज्या ज्या वेळी पाकिस्तानी नेतेअधिकारी हिंदुस्थानात चर्चेसाठी येतात तेव्हा आधी कश्मीरातील फुटीरवादीनेत्यांशी चर्चा करतातहा काय प्रकार आहेहिंदुस्थान सरकारही त्यांना परवानगी कशी देतेहे सारेच गौडबंगाल आहेयावेळीही हुरीयतच्याअध्यक्षापासून यासीन मलीकपर्यंत सर्वच आगलाव्या नेत्यांशी पाकच्या परराष्ट्र सचिवांनी दोन तास चर्चा केलीपुन्हा या चर्चेत नेमके काय शिजतेहे कधीच बाहेर येत नाहीपाकिस्तानला तिथे बसून जे करता येत नाही ते आपल्या देशात येऊन करण्याची मुभा कशी काय मिळू शकते?पाकिस्तानशी चर्चा आणि बोलणी करून काहीही साध्य होत नाहीहे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहेउलट अशा प्रत्येक चर्चेनंतर पाकिस्ताननेहिंदुस्थानात अतिरेकी हल्ले घडवून गद्दारीच केलीआता तरी हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी चर्चा आणि बोलण्यांची थेरं थांबवून पाकिस्तानला समजेलअशाच भाषेत उत्तर द्यायला हवेकारण ‘लातों के भूतबातों से नही

No comments:

Post a Comment