१४ जानेवारी
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती.सदाशिवराव पेशेव,विश्वासराव,जनकोजी शिंदे,यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे,समशेर बहाद्दर,इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले.१४ जानेवारी १७६१ हे भारताच्याइतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणीसैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, कीजगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रजबळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर त्याचवेळीमराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतची लढाईमुळे मराठीमानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठीजनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणातठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हाएकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.
पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठीआणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,"बचेंगे तोऔर लढेंगे " असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्यावाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेलीमहत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुनदुसर्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पणहे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,यातत्वासाठी मराठे पानीपतास लढले."
गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात
कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!
पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणिचिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ...!!" तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठीलढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडेपाहण्याचे धाडस केले नाही
* पानिपतचा समरप्रसंग च्या काही घटना :-
* १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.
* युद्धाची सुरवात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान झाली. गारदीच्या तोफा गरजल्या व समोररस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पठाणांवर प्रभाव पडला नाही.
* गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले व बर्खुदारखानाचा निभाव लागेना व त्यांचे हजारोंनीसैनिक मरून पडले. गारदीमागे दमाजी गायकवाड व विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले.मात्र, जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.
* त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्धलागले. मराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलो, असे वाटूलागले.
* दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढला. तोफखानाबंद पडून इब्राहिम खान जखमी.
* याचवेळी एक गोळी विश्वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले. भाऊसाहेब घोड्यावरूनदुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.
* विश्वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर व शिंदे मागून रणांगण सोडूनमार्ग काढीत दिल्लीकडे निघाले. भाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.
* दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले.भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविले. पठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नानाफडणीसाने पाहिले.
* सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश्य झाले. युद्धात व युद्धानंतर एकूण ८० हजारते १ लाख मराठे मारले गेले.
युध्दाचे नेतृत्व करणारे "श्री. सदाशिवराव उर्फ भाऊ पेशवे" यांना त्रिवार मानाचा मुजरा...
वयाच्या "१८-२०" वर्षी रणभूमीत पराक़म गाजवणारया "श्री. विश्वासराव पेशवे", "जणकोजीशिँदे" आणि "समशेर बहाद्यर" या "शूर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा"...
No comments:
Post a Comment