I,MeMyself

I,MeMyself

Monday, November 2, 2015

करार झाले

करार झाले
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले

इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले!
तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले
करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले
बरेच झाले, मजला केवळ दु:ख मिळाले!
तिच्या बिचार्‍या सुखात वाटे हजार झाले
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
नचिकेत जोशी

Sunday, November 1, 2015

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी
‪#‎The_Great_Panipat_War‬
* १८ व्या शतकात विश्वात झालेले सर्वात मोठे आणि रक्तरंजित युध्द म्हणून पानिपत च्या तिसर्या युद्धाची दखल जगभर घेतली गेली.
* मराठ्यांतर्फे ४०,००० घोडदळ,हुजुरात,१५००० पायदळ ज्यात ८००० आधुनिक बंदुकधारी गारदी,१५००० पिंडारी,२०० तोफा...असे एकूण ७०,००० सैन्य (त्यांना मदतनीस,बाजारबुणगे १ लाखाहून जास्त होते )
* अफगाण्यातर्फे ४२,००० घोडदळ,बाशगुल,३८००० पायदळ,१०,००० राखीव ,४,००० अब्दालीचे अंगरक्षक (त्यांना नसाक्ची म्हणत),५००० किझील्बाश (इराणी सैन्य),८० तोफा ...एकूण १,००,००० सैन्य
* रणसंग्रामामध्ये मराठ्यांचे ४०,००० तर ३०,००० अफगाणी सैन्य मृत्युमुखी पडले, बाजारबुणगे,मदतनिस,नालबंद,पागा सांभाळणारे,जनाना असे इतर लोकांची मोजदादच नाही ते लाखात असावेत.
* १६६५ च्या पुरंदर युद्धानंतर १०० वर्षात प्रथमच झालेला मराठ्यांचा हा इतका मोठा पराभव होता.
* पानिपत चा युद्धखर्च मराठ्यांना तेव्हाचे ९२ लक्ष म्हणजे आजचे ९५० कोटी रुपये इतका आला.
* मराठ्यांनी दिल्ली जिंकली तेव्हा शहराची अवस्था इतकी बिकट होती कि दुरुस्तीसाठी मराठ्यांनाच तेव्हाचे १५ लक्ष म्हणजे आताचे १५०-१६० कोटी रुपये खर्च करावे लागले.
* पानिपत युद्धाचे वेळी जर शाहू छत्रपती हयात असते तर सर्व सेना एका झेंड्याखाली आणि निशाणाखाली लढली असती आणि मराठे विजयी झाले असते.
* शाह वलीउल्लह च्या जिहादी प्रेरणेमुळे अब्दालीने हिंदुस्तानवर स्वार्या केल्या.
* १७५७ ते १७६१ च्या दरम्यान केलेल्या एकूण लुटीत अहमदशहा अब्दालीने २४ कोटींची संपती लुटून नेली, आजच्या काळातले सुमारे २५,००० कोटी रुपये.
* हिंदुस्तान च्या रक्षणासाठी किंवा राष्ट्ररक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी केलेली हि लढाई हे प्रमुख वैशिष्ठ्य होय.तर इथल्या अन्नावर पोसून सुद्धा अफगाण्यान्ची साथ करणारे नजिबखान आणि शुजाउद्दौला राष्ट्रद्रोही निघाले.
* पराभवानंतर मराठ्यांनी केलेली मोर्चेबांधणी,फौजेचे आधुनिकीकरण,युद्धात कुचराई करणार्यांना दिलेल्या शिक्षा, महादजी शिंद्यांनी बदला घेण्याची केलेली भीष्मप्रतिज्ञा या पार्श्वभूमीवर अब्दालीने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याची चूक केली नाही.
* झालेल्या पराभवानंतर १० च वर्षात मराठ्यांनी पुनर्वैभव प्राप्त केले
* पानिपतच्या युद्धानी मराठी भाषेतसुद्धा म्हणी आणि वाक्प्रचारांची भर घातली, जसे कि -
पानिपत होणे,संक्रांत कोसळणे,१७६० गोष्टी करणे,प्यादाचा फर्जी,भाऊगर्दी,मुरगी मारी बच्चे दानादान,कालचा शेणामेनाचा झाला लोखंडाचा,रानभरी जाहले इत्यादी.
* कुतुबशाह चे मुंडके छाटून,नजीबचे थडगे फोडून आणि हिंदुस्तान वर सत्ता पुनर्स्थापित करून मराठ्यांनी आपला पानिपत चा बदला घेतला अर्थात स्कोर सेटल केला.

Saturday, October 31, 2015

~ जगायास तेव्हा खरा अर्थ होता ~

जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरार्थासही अर्थ भेटायचे .. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्द ही यायचे ... नदी सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे .. निघुनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे .. उदाशी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे ... जरा एंक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे .. असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हयाचे .. ऋतूना ऋतूनी जरा भागलेकी नव्याने जुने झाड उगयाचे ...

मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे .. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे .. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे .. आता पाऊलेही दुखू लागलेकी जारा मीच त्यांना उरी घ्यायचे ..

Monday, August 17, 2015

बाजीराव

आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव करत होता! राजमुद्रेतील शिवछत्रपतींना अपेक्षित असलेले 'वर्धिष्णू' आणि 'विश्ववंदिता' शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच!! पण हे आम्हाला शिकवलंच जात नाही. शालेय इतिहासाच्या पुस्तकात आमच्या राष्ट्रपुरुषांना स्थान दिलं न दिल्यासारखं केलं जातं आणि रानटी मुघल आक्रमकांच्या स्तुतीपोटी मात्र पानेच्या पाने भरली जातात, ही इथली अवस्था आहे. अन् वर आम्हीच चिंता करतो की, आमची पिढी स्वदेशाभिमानी आणि कसदार का बरं होत नाही!!
वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती. साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा कल्पना!! ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे! पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो. नाहीतर मग त्याची जात पाहातो! वस्तुतः महापुरुषांची 'जात' नसते पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची 'वात' आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली 'कात' पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या स्वरुपात खुला होतो. उदाहरणार्थ - ब्रिटीश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन 'A masterpiece of strategic mobility' ह्या गौरवपूर्ण शब्दांत केलंय! का बरं म्हणाला असेल तो असं?
मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि नंतर स्वतःचीच असफजाही राजवट सुरु केलेल्या निज़ामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत १७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा करार मानायला नकार दिला. वर शहाणा कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू दोघांनाही म्हणू लागला 'तुमच्यातला खरा छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल'. पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे संभाजी निज़ामाला सामील झालेले. महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे काय! पण शाहुंनी मात्र ह्या अपमानास्पद गोष्टींना थारा द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. ह्या काळात निज़ाम स्वतः ऐवज़खानासोबत पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता. त्याचा सरदार तुर्कताज़खान नाशिक व संगमनेर भागात धुडगूस घालत होता. आणि रंभाजी निंबाळकर साताऱ्यावर बरसत होता. स्वराज्यावर असं चहुबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसऱ्याला त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युद्वेगाने थेट औरंगाबादच्या दिशेने आणि काही समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या निज़ामी प्रांताचा पार चुथडा करुन टाकला. गडबडून गेलेला निज़ाम सारे सोडून बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते. वाटेत लागणारा निज़ामचा सर्व मुलूख फस्त करत होते. बाजीरावांचा रोख पाहून निज़ामाला वाटले की ते बुऱ्हाणपूरवर हल्ला करणार. येडा सगळी तयारी करुन बसला, तर बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार भरुचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की, निज़ामशी हातमिळवणी करुन मी गुजरातवर आक्रमण करतोय. निज़ामाशी उभा दावा असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय दिल्याचे नाटक केले. कश्यात काही नसताना निज़ाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने पुणे प्रांत बेचिराख करुन टाकला. संभाजींना छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की, बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण, निज़ामाचा सगळा भर तोफखान्यावर. त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे. त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कश्याला निज़ामाला भिक घालताहेत? उलट निज़ाम पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी उलटलेला पाताळयंत्री निज़ाम दुसऱ्यांदा अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या डावाला बळी पडला! आपला सारा तोफखाना मागे अहमदनगरलाच ठेवण्याशिवाय त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती खळखळून हसली असेल त्यावेळी!!
निज़ामाच्या एकूण एक हालचालींची वार्ता गुप्तचरांमार्फत राऊंकडे पोहोचत होती. बाजीरावांनी ताबडतोब गंगापूर आणि वैजापूर लुटले व पालखेड येथे जाऊन स्थिरावले. बिथरलेला निज़ाम पालखेडवर चालून आला. मराठ्यांच्या चतुर पेशव्याला पालखेडचा भूगोल व्यवस्थित ठाऊक होता. गावाच्या पूर्वेला एकच नदी. ती राऊंनी ताब्यात घेतली. गावाला पाणीपुरवठा करणारे सारे मार्ग रोखले. निज़ामाची रसद मारली. मुलूख तर केव्हाच फस्त केलेला. दग्धभू धोरण. सैन्य घोड्याच्या नालेच्या आकारात विभागलेले. निज़ाम चालून आला आणि अन्न नाही पाणी नाही अश्या अवस्थेत बाजीरावांनी लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रे हाल खाईनात अशी अवस्था झाली त्याची. पोटात कण नाही आणि चारी बाजूंनी काळ बनून उभे ठाकलेले मराठे!! दि. २५ फेब्रुवारी १७२८. अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांच्या मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!!
चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय काय चमत्कार करुन दाखवता येतात; याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास ह्या हालचालींमध्ये दिसून येतो. बाजीरावांनी ह्या युद्धाचे ठिकाणही स्वतःच ठरवले, वेळही स्वतःच ठरवली आणि कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निज़ामाला आपल्या तालावर अक्षरशः हवे तसे नाचवले! याच मोहिमेने बाजीरावांचा आणि मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात झाली. अश्या कर्तबगार पेशव्याची आज जयंती. यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूयात. अभिमानाने फुलून जाऊयात!!
— regards
© विक्रम श्रीराम एडके
www.vikramedke.com)

Saturday, April 4, 2015

~ : भैये सर आणि मी :~

भैये सर आणि मी

खूप काही आहे ह्या मानसं बदल सांगायला. माझा गुरु ,मार्गदर्शक .सरांकडे पहिला कि मला एकाच कविता आठवते कुसुम्ग्राजांची

ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !




हे सगळा लिहायचा सुचला कारण त्या दिवशी त्यांचा दिवस होता . सगळ्या माजी विद्यार्थ्यांना बोलावलं होता अर्थात मी हि गेलो. सरांचा बोलणं सहसा कोणी तलत नाहीच . सरांना स्वतालाच माहित नसेल किती engineer , doctor  घडवले आहेत. 

कोणत्या हि विषयावर ह्या मानसं कडे सल्ला मग तुम्ही कधी निराश होणार नाही. ह्यांची मत फार पटतात मला. ह्या माणसाला ओळख्नार्याना हि असाच काही वाटता असावा. सरांनी ५० शी ओलांडली. आता ते फार कमी शिकवतात. आपला आयुष्य पूर्ण पणे जगलेला आणि जगणारा माणूस. ह्यांना भेटल्यावर एक वेगळीच energey मिळते. काही मानसं असतातच खूप प्रभावी. माझ्या आयुष्यात ह्या व्यक्तीला अनन्या साधारण महत्व आहे. 





Monday, March 23, 2015

~ वीरजी व्होरा ~






जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि शिवाजी महाराज !
वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी.हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता. तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर.
*डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता.याची वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष (तत्कालीन) रुपये होती , तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. (तेव्हाचे १ कोटी आताचे सुमारे ७५०० कोटी )
* मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न १५-२० लाखांच्या आसपास होती, यावरून वीरजी व्होरा च्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो.
* भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे.सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या.
* इस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते, तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापार्यांना याने सावकारी कर्ज दिले होते.
* संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात असते, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई.
* शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांनी खंडणी दिली तर सुरत वर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती,परंतु वीरजीने हि मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
* सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज... ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता.
* सुरत च्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले,यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरत वर दुसर्यांदा हल्ला केला यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला.
* जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला.
संदर्भ - डच रेकॉर्ड्स
इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स

Sunday, March 15, 2015

कसे सरतील सये !!!

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना ?
गुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा  सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना ?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना ?


गीतकार : संदीप खरे, संगीतकार : -, गायक : संदीप खरे, गीत संग्रह / चित्रपट : दिवस असे की