I,MeMyself

I,MeMyself

Monday, February 6, 2012

दुनियादारी सुहास शिरवळकर


सध्या वाचत असलेला पुस्तक : दुनियादारी सुहास शिरवळकर


 दुनियादारी सुहास शिरवळकर




दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणून जर वाचायला वेळ असेल तेंव्हाच हे पुस्तक उघडा…पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र एक सुन्न करणारा अनुभव येतो..

कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे हे.. ’दुनियादारी’ला पर्याय नाही…हे पुस्तक वाचल्या शिवाय कॉलेज लाइफ सुरु करुच नये असे मला वाटते. तसेच प्रत्येक पालकांनीही हे पुस्तक वाचल्या शिवाय त्यांनाही तरुणांच्या दुनियेचा अंदाज येणार नाही.

जरी आज कॉलेजात जाणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचलं तरी त्यांना असं वाटेल की सगळ्या घटना अगदी आपल्या सभोवताली घडत आहेत असे वाटेल.. आणि हेच त्या पुस्तकाच्या यशाचे रहस्य आहे. अहो बघा ना, २५ वर्षांपुर्वी लिहिलेलं पुस्तक अजुन ही वाचतांना ताजं तवानं /फ्रेश वाटेल..

खेळ मांडला….


तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग कश्यापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
ववाळुन उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला…
खेळ मांडला…. खेळ मांडला….
खेळ मांडला…. खेळ मान्ड…
सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा..
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला..
दावि देवा पैल पार पाठीशी तू र्‍हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला…
उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुई परी जिनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे
इनविती पंचप्राण. जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळल शिवार
तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला


गुरू ठाकूर, अजय अतुल..

Wednesday, February 1, 2012

हरवले मी स्वर


हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक...........
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक.............
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द............
कळतील तुला का ते बोल निशब्द.............




♥ "जगावे असे, कि मरणे अवघड होइल
हसावे असे, कि रडणे अवघड होइल
कुणासाठि प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे, कि तोडणे अवघड होइल" ♥