I,MeMyself

I,MeMyself

Monday, February 6, 2012

दुनियादारी सुहास शिरवळकर


सध्या वाचत असलेला पुस्तक : दुनियादारी सुहास शिरवळकर


 दुनियादारी सुहास शिरवळकर




दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणून जर वाचायला वेळ असेल तेंव्हाच हे पुस्तक उघडा…पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र एक सुन्न करणारा अनुभव येतो..

कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे हे.. ’दुनियादारी’ला पर्याय नाही…हे पुस्तक वाचल्या शिवाय कॉलेज लाइफ सुरु करुच नये असे मला वाटते. तसेच प्रत्येक पालकांनीही हे पुस्तक वाचल्या शिवाय त्यांनाही तरुणांच्या दुनियेचा अंदाज येणार नाही.

जरी आज कॉलेजात जाणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचलं तरी त्यांना असं वाटेल की सगळ्या घटना अगदी आपल्या सभोवताली घडत आहेत असे वाटेल.. आणि हेच त्या पुस्तकाच्या यशाचे रहस्य आहे. अहो बघा ना, २५ वर्षांपुर्वी लिहिलेलं पुस्तक अजुन ही वाचतांना ताजं तवानं /फ्रेश वाटेल..

No comments:

Post a Comment