I,MeMyself

I,MeMyself

Saturday, April 28, 2012

मुंबई - मंग्लोरे - मालवण - मुंबई 31st 2011

मुंबई - मंगलोर - मालवण - मुंबई 31st  2011

हा  प्लान  खरतर समाधान चा होता . त्याने मला विचारला आणि मी लगेच हो म्हंटला कारण त्याच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो मला.

प्लान ठरला मग मी ठरवला कि आपण मंगलोरला जावू आणि मग तिथून मालवण.मी ट्रेनचा बुकिंग पाहू लागलो पण साला सगळा फुल.मला रात्रीच प्रवास आवडतो आणि पहिल्यांदा महाराष्ट्र बाहेर जाणार म्हणून मग मजा आल्यासारखा १५०० ला व्ल्वो ची बुकिंग केली.

पहिला दिवस : - 

ऑफिस मध्ये का कोण जाणे त्या दिवशी खूप काम होते.पण मी निघालो ५.०० ला.ऑफिस मधून परस्पर  जाणार म्हणून बाग ऑफिस मधेच आणली होती.ऑफिस च्या कपड्यावरच निघालो.काका (समाधान चे वडील ) सोडायला येणार होते पण बरे झाला नाही आले.कारण मला गाडी लगेच मिळाली जराशी चुका मूक झाली असती तरी त्यांचा काही उपयोग झाला नसता येवून.माझे वडील सुधा येणार होते पण मीच नको म्हणालो.

आज पर्यंत  वोलवो  फक्त बाहेरूनच पाहिलेली.१० वेळा तिकीट वरचा  गाडी चा न. पहिला.दोन दाबेल्या खालालय पण नेहमी प्रमाणे पाणी घायला विसरलो.समाधान ला फोने केला तेव्हाच गाडी आली होती.गाडीत बसलो तोचा माझ्या दीदी चा messege  आला "सगळा बरो बर घे .स्वेटर घेतला का . ......etc " आई नंतर काळजी करणारी माझी लाडकी बहिण.स्तीर्स्तावर झालो आणि मग घरी फोने केला.आपी ला फोन केला . तिला नुकताच हॉस्पिटल मधून आणला होता.ऐर्टेल चा साला त्याचा दिवशी प्रोब्लेम झाला होता  फोन लागत नव्हते.

गाडीत बसलो तर बाजूला मुलगा साला तो पण southindian मग काय बाहेर बघत राहिलो तशी पण माझी विंडोव seat होती.मी शक्यतो प्रवासात कोणाशी बोलत नाही कारण जर समोरचा पकाव निघाला तर वाट लागते.मी पाहत बसतो आजूबाजूला कोण कोण काय काय करतं ते त्यातच मजा येते.समाधान्शी संपर्कात होतो.पण साला मला घ्यायला येणार नव्हता तो.गाडी सकाळी कर्नाटकात होती.मंग्लोरे आला.समाधान चा मित्र आला होता .मला तो पोरगा मस्त वाटला भैया भैया म्हणून बोलायाचा.त्याला वाटला कि मी समाधानचा मोठा भाऊ आहे ( तसा मी मोठा आहेच.) "राहील" हे त्याचा नाव.मग तो आणि मी घरी आलो.फ्रेश होवून जेवायला बाहेर गेलो.समाधान येई पर्यंत सगळे mall पालथे घातले.नेहमी प्रमाणे समाधान उशिरा आला.त्याला  तशा मी फोने करून शिव्या पण घातल्या.पण सल्याने दुसर्या दिवशी सुट्टी टाकली होती त्यामुळे वाचला.  


राहील भाई 




१) सुलतान बतेरी :

हो नाही करता करता ७-८ जन गेलो.मंग्लोरे मधला एक मस्त समुद्र किनारा.नदी पार करावी लागते फैरी ने.आम्ही गेलो तेव्हा सूर्य मावळत होता.तेथे पोहोचलो तेव्हा काळोखाच एकदम.थोडे फोटो काढून परत फिरलो.

गुलाबी गुलाबी 




मी आणि समा...

मी आणि राहील


२) मंदिर

सुलतान बतेरी वरून समाधान च्या नेहमीच्या ठिकाणी गेलो मंदिर.समाधान नेहमी ह्या मंदिरात येतो.खरतर मंग्लोरे मध्ये मंदिर भरपूर आहेत त्यातलाच हे एक अतिशय सुंदर मंदिर.मी,समा आणि राहील.राहील साहेब नास्तिक आहेत मग मी आणि समा गेलो मंदिरात.मंदिर तर पूर्ण सोनेरी होता.मुंबई मध्ये अशी मंदिर दुर्मिळ .

 दुसरा दिवस .

सकाळी मी जरा लवकर उठलो.तयार झालो.नाश्ता करण्यासाठी डोसा प्लाझा मध्ये गेलो (मला नाव नीटसा आठवत नाही आहे).मस्त होता पण डोसा.त्या नंतर समाधान चा लोन चा काम करायला गेलो.त्या दिवशी सगळा प्रवास बस ने केला.मंग्लोरे मध्ये बस service मस्त आहे.प्रत्येक रंगाच्या बसेस.तिकीट पण मस्तच कागदाचा तुकडा आणि त्यावर काही तरी रागडलेल.समाधान थोडा वेळ कंपनी मध्ये गेला होता तो पर्यंत मी आणि सिद्धार्थ अजून एका मंदिरात जावून आलो.त्यादिवशीच मालवणला जायचा होता म्हणून मग लवकरच घरी आलो.त्या दिवशी ची खास गोष्ट म्हणजे चिकन "चिकन तीक्क्का हलाल " आणि नंतर "पब्बास " एक मस्त ice - cream parlore .त्यानंतर गाडी आली आणि आम्ही मालवण प्रवासाला लागलो.
समाधानचे सगळेच मित्र मला ओळखतात.इन्फोसिस  वाले नवीन होते.विजय एकदा भेटला होता मुंबई मध्ये पण तो वर वर ........
पण त्यानंतर मात्र गपांचा फड रंगला आणि मी हि त्यांचातलाच एक होवून बसलो.साम्याचे मित्र मस्त आहेत.


तिसरा दिवस


आम्ही पणजी ला पोहचलो.आता पणजी तून समा organizer  आणि विजय कोरपे lead  करणार होता.तिकडून मग मालवणची बस पकडली.अभिनंदन साहेब मग २ नो गेले आणि गाडी आम्हाला थांबवावी लागली विनाणती करून.अभय ला घाल घाल शिव्या घातल्या.लाल डबा खालीच होता पण तरी आम्ही मागची जागा पकडली.भंकस चालू झाली.अमोल साहेब मात्र फोने वर कोणाला तरी काही सांगत होते.त्याला पण थोड्या शिव्या पडल्या थोड्या सगळ्यांकडून.त्यात काय कमी होती म्हणून एक फिरंगी पण चढला तो पण मालवण ला चालला होता.त्याला पता सांगितला आणि विजय आणि समा त्याचा डोकं खात बसले.बर तो एकता कुठे निघाला होता काय माहित.त्यात पण काय कमी होती म्हणून हा अभया पण कान चावायला गेला त्याचे.आम्ही मागेच होतो मजा बघत.दोन तासांनी कुडाळ ला पोहचलो.आमची गाडी वाट पाहत बाहेरच उभी होती.ती पकडून मग मालवण गाठला.विजय साहेब थोडे कॉंफुस झाले पण पठ्याने घर शोधला.



घर काय वाडाच तो आणि घराचे लोक पण देव मानसं.नाही तर एवढ्या लोकांना कोण देयील राहायला.फ्रेश झालो आणि मग मोहिमे वर निघालो.


१) सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग ला आलो आणि सगळ्यान स्नोर्ण्क्लिंग करायची हौसा झाली.शेवटी हो नाही करता करता ठरला कि स्नोर्क्लिंग नाही तर स्क्क़ुब डायविंग करायची.१००० रुपरायाला  फोडणी प्रत्यकी.विजय साहेब थोडे नाराज दिसले कारण video निघणार नव्हता.

स्कूबाला एवढी गर्दी पाहून मग आधी गड फिरायचं ठरलं.

सिंदुदुर्ग बदल थोडसं

सिंधुदुर्ग म्हणजे अठरा टोपकरांच्या ऊरावर शिवप्रभूनी उभारलेला एक बळकट जलदुर्ग आहे.मालवण 


नजीक असणारे कुरटे नावाचे हे बेट तटबंदी घालून बंदिस्त केले आहे.आरमार पावसाळ्यात वसवण्यासाठी 


उत्तम बंदराचा आणि जंजिर्याचा आसरा लागतो.गोव्याच्या पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी या दुर्गाची रचना 


केली गेली.


सिंधुदुर्गाच प्रवेशद्वार जीभीचे आहे.त्यातून आत आल्यावर उजवीकडे वळून पायर्यांवरून फांजीवर गेल्यास 


दोन घुमट्या आहेत.तेथील दोन घूमट्यात चुन्यात हातापायांचे ठसे आहेत.ते 'तीर्थरूप कैलासवासीमहाराज 


राजश्री छत्रपती' यांच्या हातापायांचे आहेत,असे इ.स.१७६२ मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाई यांनी सिंधुदुर्गचा 


किल्लेदार येसाजी शिंदे याला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.


तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यास डाव्या हाताला एक 


आगळेवेगळे नारळाचे झाड आहे.त्या झाडाला दोन फांद्या आहेत आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागले 


आहेत.तेथून पुढे गेल्यास शिवराजेश्वर मंदिर आहे.हे शिवाजीमहाराजांचे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराज


 यांनी बांधलेले आहे.आत शिवाजीमहाराजांची मूर्ती आहे.


दुर्गावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.दहिबाव,दुधबाव,साखरबाव अशी त्यांची नवे 


आहेत.कोल्हापूरच्या छत्रपतीकडे या दुर्गाचा ताबा आहे.काही काळ चाच्यांनी हा दुर्ग ताब्यात घेतला 


होता.इंग्रजांनी चाच्यांकडून हा दुर्ग जिंकून त्याचे नाव ठेवले 'फोर्ट ऑगस्टस'


सिंधुदुर्गाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.त्याच्या तटबंदी चा परीघ ५-६ किलोमीटर तरी आहे.त्या तटबंदी वर 


जाण्यासाठी ४५ जिने बांधलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीतच ४० शौचकुपे 


आहेत.इतक्या मोठ्या संखेने शौचकुपे असल्याचे इतर दुर्गात आढळत नाही.मळाचा कोणताही त्रास दुर्गात 


होत नाही.दुर्गाचे क्षेत्रफळ २० हेक्टर असावे.आत सुमारे अडीच-तीन हजार लोक दुर्ग लढवण्यास असताना 


स्वच्छतेची इतकी उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या त्या स्थापतीचे कौतुक करावयास हवे.


सिंधुदुर्गाची हि रचना अभ्यास करण्यासारखी आहे.सध्या दुर्गाला ४० ठिकाणी भगदाडे पडली आहेत.त्यातून


 सागराचे पाणी आत येते.इथे समुद्रात डॉल्फिन्स हि आहेत.सिंधुदुर्गाची वैशिष्ट्य पाहण्याची सहल 


अभ्यासपूर्णठरेल.


एक ग्रुप फोटो 

गड फिरल्यावर स्कूबा ड्यिंग झाली.विजय ला कोणी तरी म्हणाला कि मी फोटो पाठवतो पण ते अजून आले नाहीत.त्याला त्या लोकांनी चू ... बनवला.


२) तर्करली 

कोकणातला एक सुंदर समुद्र किनारा.इथे आम्ही जवळ जवळ ५ दरम्यान पहोच्लो.मग काय मनसोक्त डुंबून घेतला.थोडा फोटो शूट केला.इकडे तिकडे झलक मारली.३१स्त होता त्यामुळे जरा जास्त लोक होती.२०११ ला गुड बये करायला एक उत्तम जागा.


३) साळसकर गणपती.


जबर लक म्हणजे ३१स्त ला आरती मिळाली आम्हाला गणपतीची.


आता मात्र थकून सर्वाना भूक लागली.काही जन म्हणाले कि पार्ट्य बघायला जावू beach  पार्टी .मला नाव माहित नाही पण सांगून सुधा उपयोग नाही कारण अशी पार्टी नव्हती पिणार नाही हे सगळ्यांनी ठरवला होत.मग खाण्यावर तुटून पडायचा ठरलं.एक प्रोब्लेम होत अर्ध्या पेक्षा जास्त लोक veggii  ( घास पूस खाणारे)
एक हॉटेलात तर पाणी पिवून बाहेर आलो कारण वेज मध्ये काही नव्हत.मग  ड्रावर मित्राने एक खानावळीत गाडी न्हेली.मग काय आम्ही दिली नोन वेज ओर्डर.वेज मध्ये पाहतो तर कसली तरी भाजी होती.मग आम्ही आमच्या वेज मित्रांना विसरून जेवेनावर तव मारला.वैतागलेले वेज वाले दुसर्या हॉटेलात गेले.तिथे बहुदा वेज मिळाला असेल.


आम्ही जेवून मग दुसऱ्या दिवसाची प्लान्निंग करू लागलो.विजयदुर्गा पाहायचा बेत त्या दिवशीच कॅन्सिल झाला.मग गाडी सोडून दयाच ठरलं.सगळे घरी आलो happy  new  year  करून झोपलो.


चौथा दिवस : -


सकाळी उठून मग वेंगुर्ला beach  जो अगदी घराच्या मागेच होत.मग काय झालो सुरु.काय काय खेळलो (काबाडी,खोखो,क्रिकेट,शिवाजी शिवाजी).साधारण १२ च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला लागलो.


एक फमिली फोटो ...


छोटू चा बरेच फोटो काढले.ते तसे मी न  विसरता पढवले पण होते दादाला.


परतीच्या वेळी मग पुढच्या प्लान्निंग ची सुरवात झाली.एक अनिखा मित्र परिवार आता हे सगळे FB  वर आहेत.दांडेकर साहेबांनी तर ग्रुप पण बनवला आहे.






समाप्त


राहुल घोलप.


















1 comment: