I,MeMyself

I,MeMyself

Saturday, December 26, 2015

माझी मैना गावावर राहिली


माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाला | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची | काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची |

मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||

Thursday, December 24, 2015

मराठे

मुघल इतिहासकार खफीखान लिहतो...
त्याच मराठी भाषांतर
कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे
यांचा शिवाजीराजा नाहीए
संभाजी ला आम्ही मारले आहे
राजाराम पण आता जिवंत नाही
संभाजीची बायको व मुलगा आमच्या ताब्यात आहे
पाच वर्षाच्या पोराला राजा करुन राजारामाची बायको ताराराणी काही हजार सैन्यानीशी आमच्या लाखाच्या वर सैन्यांशी दोन हात करतेय
इराण पासुन ते उत्तर दक्षिण हिंदुस्तान आमच्या बादशाह ला घाबरतो
पण हे मराठे........
आमच्या सैनिकांना स्वप्नात व घोड्यांना पण पाण्यात दिसतात
ह्यांची सहाशे - सातशे ची शिबंदी पुर्ण किल्ला आमच्या विस हजार सैन्या पुढे लढवते, वर आम्ही यांना जर खलीता पाठवला की गड ख़ाली करा नाहीतर जेव्हा जिंकेल तेव्हा तुमची पोर मारु बायको नासवु
पण ह्यांच पोर पण घाबरत नाय आणी बायका तो खलीता घालतात चुलीत
तेव्हा वाटत काय चीज आहे हे मराठे
मरायला ही तयार आणी मारायला लागले की पिवळा भंडारा लवलेले हे लोक आमच्या रक्ताने लाल होतात
शिवाजीची स्वामिनीष्ठा आणी संभाजी ची जीव गेला तरी शरण जायच नाय हि शिकवण, अशी मस्ती असलेले हे मराठे.....
आज आमचे बादशहा गेले
त्यांनी अनेक राजे संपवले पण त्यांना आज काफीर मराठ्यांनी संपवले
या ख़ुदा क्या लोग हे यह मराठे
कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही,
तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो,
तर कोणी आपल्या राजाचा शब्द राखन्यासाठी भल्यामोठ्या मदोन्मत्त हत्तीशी झुंज देतो...
कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो
कोणी ८० व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रुंना लोळवतो
तर कोणी मिसुरड न फुटलेल पोर पडणारे भगव निशाण सावरत विस एक गनिमांना मारतो
कोणी ७ वीर मराठे तीस हजार फौजेला भिडतात
तर कोणी ६० मावळ्यांना घेऊन गड जिंकुन देतात ..!
यांचे हे असामान्य बलिदान हे शिवाजींने केलेल्या महान कार्याची व संभाजींच्या बलिदानाची खरीखुरी पावतीच होय..!

Monday, November 2, 2015

करार झाले

करार झाले
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले

इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले!
तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले
करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले
बरेच झाले, मजला केवळ दु:ख मिळाले!
तिच्या बिचार्‍या सुखात वाटे हजार झाले
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
नचिकेत जोशी

Sunday, November 1, 2015

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी
‪#‎The_Great_Panipat_War‬
* १८ व्या शतकात विश्वात झालेले सर्वात मोठे आणि रक्तरंजित युध्द म्हणून पानिपत च्या तिसर्या युद्धाची दखल जगभर घेतली गेली.
* मराठ्यांतर्फे ४०,००० घोडदळ,हुजुरात,१५००० पायदळ ज्यात ८००० आधुनिक बंदुकधारी गारदी,१५००० पिंडारी,२०० तोफा...असे एकूण ७०,००० सैन्य (त्यांना मदतनीस,बाजारबुणगे १ लाखाहून जास्त होते )
* अफगाण्यातर्फे ४२,००० घोडदळ,बाशगुल,३८००० पायदळ,१०,००० राखीव ,४,००० अब्दालीचे अंगरक्षक (त्यांना नसाक्ची म्हणत),५००० किझील्बाश (इराणी सैन्य),८० तोफा ...एकूण १,००,००० सैन्य
* रणसंग्रामामध्ये मराठ्यांचे ४०,००० तर ३०,००० अफगाणी सैन्य मृत्युमुखी पडले, बाजारबुणगे,मदतनिस,नालबंद,पागा सांभाळणारे,जनाना असे इतर लोकांची मोजदादच नाही ते लाखात असावेत.
* १६६५ च्या पुरंदर युद्धानंतर १०० वर्षात प्रथमच झालेला मराठ्यांचा हा इतका मोठा पराभव होता.
* पानिपत चा युद्धखर्च मराठ्यांना तेव्हाचे ९२ लक्ष म्हणजे आजचे ९५० कोटी रुपये इतका आला.
* मराठ्यांनी दिल्ली जिंकली तेव्हा शहराची अवस्था इतकी बिकट होती कि दुरुस्तीसाठी मराठ्यांनाच तेव्हाचे १५ लक्ष म्हणजे आताचे १५०-१६० कोटी रुपये खर्च करावे लागले.
* पानिपत युद्धाचे वेळी जर शाहू छत्रपती हयात असते तर सर्व सेना एका झेंड्याखाली आणि निशाणाखाली लढली असती आणि मराठे विजयी झाले असते.
* शाह वलीउल्लह च्या जिहादी प्रेरणेमुळे अब्दालीने हिंदुस्तानवर स्वार्या केल्या.
* १७५७ ते १७६१ च्या दरम्यान केलेल्या एकूण लुटीत अहमदशहा अब्दालीने २४ कोटींची संपती लुटून नेली, आजच्या काळातले सुमारे २५,००० कोटी रुपये.
* हिंदुस्तान च्या रक्षणासाठी किंवा राष्ट्ररक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी केलेली हि लढाई हे प्रमुख वैशिष्ठ्य होय.तर इथल्या अन्नावर पोसून सुद्धा अफगाण्यान्ची साथ करणारे नजिबखान आणि शुजाउद्दौला राष्ट्रद्रोही निघाले.
* पराभवानंतर मराठ्यांनी केलेली मोर्चेबांधणी,फौजेचे आधुनिकीकरण,युद्धात कुचराई करणार्यांना दिलेल्या शिक्षा, महादजी शिंद्यांनी बदला घेण्याची केलेली भीष्मप्रतिज्ञा या पार्श्वभूमीवर अब्दालीने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याची चूक केली नाही.
* झालेल्या पराभवानंतर १० च वर्षात मराठ्यांनी पुनर्वैभव प्राप्त केले
* पानिपतच्या युद्धानी मराठी भाषेतसुद्धा म्हणी आणि वाक्प्रचारांची भर घातली, जसे कि -
पानिपत होणे,संक्रांत कोसळणे,१७६० गोष्टी करणे,प्यादाचा फर्जी,भाऊगर्दी,मुरगी मारी बच्चे दानादान,कालचा शेणामेनाचा झाला लोखंडाचा,रानभरी जाहले इत्यादी.
* कुतुबशाह चे मुंडके छाटून,नजीबचे थडगे फोडून आणि हिंदुस्तान वर सत्ता पुनर्स्थापित करून मराठ्यांनी आपला पानिपत चा बदला घेतला अर्थात स्कोर सेटल केला.

Saturday, October 31, 2015

~ जगायास तेव्हा खरा अर्थ होता ~

जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरार्थासही अर्थ भेटायचे .. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्द ही यायचे ... नदी सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे .. निघुनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे .. उदाशी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे ... जरा एंक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे .. असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हयाचे .. ऋतूना ऋतूनी जरा भागलेकी नव्याने जुने झाड उगयाचे ...

मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे .. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे .. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे .. आता पाऊलेही दुखू लागलेकी जारा मीच त्यांना उरी घ्यायचे ..

Monday, August 17, 2015

बाजीराव

आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव करत होता! राजमुद्रेतील शिवछत्रपतींना अपेक्षित असलेले 'वर्धिष्णू' आणि 'विश्ववंदिता' शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच!! पण हे आम्हाला शिकवलंच जात नाही. शालेय इतिहासाच्या पुस्तकात आमच्या राष्ट्रपुरुषांना स्थान दिलं न दिल्यासारखं केलं जातं आणि रानटी मुघल आक्रमकांच्या स्तुतीपोटी मात्र पानेच्या पाने भरली जातात, ही इथली अवस्था आहे. अन् वर आम्हीच चिंता करतो की, आमची पिढी स्वदेशाभिमानी आणि कसदार का बरं होत नाही!!
वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती. साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा कल्पना!! ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे! पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो. नाहीतर मग त्याची जात पाहातो! वस्तुतः महापुरुषांची 'जात' नसते पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची 'वात' आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली 'कात' पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या स्वरुपात खुला होतो. उदाहरणार्थ - ब्रिटीश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन 'A masterpiece of strategic mobility' ह्या गौरवपूर्ण शब्दांत केलंय! का बरं म्हणाला असेल तो असं?
मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि नंतर स्वतःचीच असफजाही राजवट सुरु केलेल्या निज़ामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत १७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा करार मानायला नकार दिला. वर शहाणा कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू दोघांनाही म्हणू लागला 'तुमच्यातला खरा छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल'. पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे संभाजी निज़ामाला सामील झालेले. महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे काय! पण शाहुंनी मात्र ह्या अपमानास्पद गोष्टींना थारा द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. ह्या काळात निज़ाम स्वतः ऐवज़खानासोबत पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता. त्याचा सरदार तुर्कताज़खान नाशिक व संगमनेर भागात धुडगूस घालत होता. आणि रंभाजी निंबाळकर साताऱ्यावर बरसत होता. स्वराज्यावर असं चहुबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसऱ्याला त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युद्वेगाने थेट औरंगाबादच्या दिशेने आणि काही समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या निज़ामी प्रांताचा पार चुथडा करुन टाकला. गडबडून गेलेला निज़ाम सारे सोडून बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते. वाटेत लागणारा निज़ामचा सर्व मुलूख फस्त करत होते. बाजीरावांचा रोख पाहून निज़ामाला वाटले की ते बुऱ्हाणपूरवर हल्ला करणार. येडा सगळी तयारी करुन बसला, तर बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार भरुचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की, निज़ामशी हातमिळवणी करुन मी गुजरातवर आक्रमण करतोय. निज़ामाशी उभा दावा असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय दिल्याचे नाटक केले. कश्यात काही नसताना निज़ाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने पुणे प्रांत बेचिराख करुन टाकला. संभाजींना छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की, बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण, निज़ामाचा सगळा भर तोफखान्यावर. त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे. त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कश्याला निज़ामाला भिक घालताहेत? उलट निज़ाम पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी उलटलेला पाताळयंत्री निज़ाम दुसऱ्यांदा अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या डावाला बळी पडला! आपला सारा तोफखाना मागे अहमदनगरलाच ठेवण्याशिवाय त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती खळखळून हसली असेल त्यावेळी!!
निज़ामाच्या एकूण एक हालचालींची वार्ता गुप्तचरांमार्फत राऊंकडे पोहोचत होती. बाजीरावांनी ताबडतोब गंगापूर आणि वैजापूर लुटले व पालखेड येथे जाऊन स्थिरावले. बिथरलेला निज़ाम पालखेडवर चालून आला. मराठ्यांच्या चतुर पेशव्याला पालखेडचा भूगोल व्यवस्थित ठाऊक होता. गावाच्या पूर्वेला एकच नदी. ती राऊंनी ताब्यात घेतली. गावाला पाणीपुरवठा करणारे सारे मार्ग रोखले. निज़ामाची रसद मारली. मुलूख तर केव्हाच फस्त केलेला. दग्धभू धोरण. सैन्य घोड्याच्या नालेच्या आकारात विभागलेले. निज़ाम चालून आला आणि अन्न नाही पाणी नाही अश्या अवस्थेत बाजीरावांनी लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रे हाल खाईनात अशी अवस्था झाली त्याची. पोटात कण नाही आणि चारी बाजूंनी काळ बनून उभे ठाकलेले मराठे!! दि. २५ फेब्रुवारी १७२८. अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांच्या मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!!
चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय काय चमत्कार करुन दाखवता येतात; याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास ह्या हालचालींमध्ये दिसून येतो. बाजीरावांनी ह्या युद्धाचे ठिकाणही स्वतःच ठरवले, वेळही स्वतःच ठरवली आणि कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निज़ामाला आपल्या तालावर अक्षरशः हवे तसे नाचवले! याच मोहिमेने बाजीरावांचा आणि मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात झाली. अश्या कर्तबगार पेशव्याची आज जयंती. यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूयात. अभिमानाने फुलून जाऊयात!!
— regards
© विक्रम श्रीराम एडके
www.vikramedke.com)

Saturday, April 4, 2015

~ : भैये सर आणि मी :~

भैये सर आणि मी

खूप काही आहे ह्या मानसं बदल सांगायला. माझा गुरु ,मार्गदर्शक .सरांकडे पहिला कि मला एकाच कविता आठवते कुसुम्ग्राजांची

ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !




हे सगळा लिहायचा सुचला कारण त्या दिवशी त्यांचा दिवस होता . सगळ्या माजी विद्यार्थ्यांना बोलावलं होता अर्थात मी हि गेलो. सरांचा बोलणं सहसा कोणी तलत नाहीच . सरांना स्वतालाच माहित नसेल किती engineer , doctor  घडवले आहेत. 

कोणत्या हि विषयावर ह्या मानसं कडे सल्ला मग तुम्ही कधी निराश होणार नाही. ह्यांची मत फार पटतात मला. ह्या माणसाला ओळख्नार्याना हि असाच काही वाटता असावा. सरांनी ५० शी ओलांडली. आता ते फार कमी शिकवतात. आपला आयुष्य पूर्ण पणे जगलेला आणि जगणारा माणूस. ह्यांना भेटल्यावर एक वेगळीच energey मिळते. काही मानसं असतातच खूप प्रभावी. माझ्या आयुष्यात ह्या व्यक्तीला अनन्या साधारण महत्व आहे. 





Monday, March 23, 2015

~ वीरजी व्होरा ~






जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि शिवाजी महाराज !
वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी.हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता. तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर.
*डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता.याची वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष (तत्कालीन) रुपये होती , तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. (तेव्हाचे १ कोटी आताचे सुमारे ७५०० कोटी )
* मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न १५-२० लाखांच्या आसपास होती, यावरून वीरजी व्होरा च्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो.
* भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे.सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या.
* इस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते, तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापार्यांना याने सावकारी कर्ज दिले होते.
* संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात असते, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई.
* शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांनी खंडणी दिली तर सुरत वर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती,परंतु वीरजीने हि मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
* सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज... ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता.
* सुरत च्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले,यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरत वर दुसर्यांदा हल्ला केला यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला.
* जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला.
संदर्भ - डच रेकॉर्ड्स
इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स

Sunday, March 15, 2015

कसे सरतील सये !!!

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना ?
गुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा  सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना ?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना ?


गीतकार : संदीप खरे, संगीतकार : -, गायक : संदीप खरे, गीत संग्रह / चित्रपट : दिवस असे की

Tuesday, February 3, 2015

एक महान सरसेनापती.(संताजी घोरपडे)

सरसेनापती संताजी घोरपडे
महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली. शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाढ़ला. या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.
चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)
म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो. संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिरक्यांचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले.
शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.
पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला. जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)
जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणी राजाराम राजात वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडली सल्ले देत होती.संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिमखान जिंजी कड़े चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरम नजिक कावेरिपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणी खान कांचीपुरमला पलुन गेला, तिथे त्याने देवलांचा आश्रय घेतला आणी धोका मिटे पर्यंत तिथेच लपून बसला.याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केलि आणी याचप्पा नायका संगे मोगलान विरोधात लढु लागले.राजारामने संताजिंस सुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवान कड़े देण्यात आले होते. येथे एक लक्ष्यात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोग्लान विरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोग्लाना वतना साठी किंवा कुठच्या पदासाठी जाउन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र लढा जो १८५७ च्या क्रांति पेक्षा ही किती तरी पटीने सरस होता.जाने १६९५ दरम्यान संताजी ने कर्नाटकातुन मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुबेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २०००० सैन्या पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पलुन गेला. मराठयानी बुरहानपुर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरन्ग्यास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुबेदारास बांगड्यानचा आहेर पाठवला.नंतर संताजीने सुरत लूटण्याचा बेत आखला होता पण तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पलुन गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)
संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)
संताजी घोरपडे यांच्या आयुशातला दूसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टणची लढाई. या युद्धात संताजिने हिम्मत खान बहादुर याचा पूर्ण बीमोड केला. दोद्देरीच्या युद्धात मराठयानी कासिम खानचे कंबरडेच मोडले होते. वास्तविक कासिम खानच्या मद्तींस औरंगजेबाने हिम्मत खानास पाठवले होते. बसवापट्टणच्या जवळ हिम्मत खानाने आपला तळ टाकला होता, तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता. एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजेनिशि हिम्मत खानवर चालून गेले. हिम्मत खानास जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा युद्धास तयार झाला. मोगल सैन्य संताजिंवर तुटून पडले, युद्धास तोंड फुटले. मराठे युद्धात पडू लागले आणि संताजिने माघारिचे कर्ण फूंकले. आता मोग्लांस चेव चडला आणि पळणार्या मराठ्यांचा त्यांनी पाठलाग सुरु केला. संताजी बसवापट्टणच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले. त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले. जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदुकधार्यंनी एक एक करुन मोग्लंना टिपले. युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले, जे मोगल सैन्य वरचढ़ झाले होते तेच आता पाठ दाखवून पलू लागले. पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता. आता हिम्मत खान सुद्धा शर्थीने लढु लागला पण बंदुकीचा एक गोला त्याच्या डोक्यास लागला आणि तो बेशुद्ध झाला. हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जख्मी झाला. बाप लेकास मोगल सैनिक परत कसेबसे घेउन गेले. त्या रात्री हिम्मत खान मरण पावला. खानाच्या लष्करातील अनेक घोडे, हत्ती, तोफा, शास्त्रे संताजिच्या हाती लागले. या लढ़ाईचा खाफिखान दाखला देतो. या लढ़ाई नंतर संताजी, जिंजिंस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले.
संताजी जिंजी कड़े येत असताना, वाटेत अर्काट नजिक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला. या युद्धात संताजिचा पाडाव झाला आणि ते पलुन गेले असे भीमसेन सक्सेना लिहितो. ते थेट गेले ते जिंजित, तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहिम करण्याचे मनसूबे रचले असे कही इंग्लिश पत्रे लिहितात. पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काही तरी बिनसले. नक्की काय झाले याचे दाखले कोणीच देत नाहीत. पण राजारामशी वितुष्ट येताच संताजी आपल्या २० हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. संताजिचा बीमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव, अमृतराव निमंबालकर असे वीर घेउन जिंजी बाहेर पडले. संताजिना त्यांनी आयेवरकुट्टी यथे गाठले, या दोघात मोठे युद्ध झाले आणि शेवटी राजारामचा पराजय झाला. धनाजी पलुन जाण्यात यशस्वी झाले तर अमृतराव निमंबालकर या युद्धात मारले गेले. खुद्द राजराम राजांस संताजिने कैद केले पण नंतर सन्मानाने मुक्त सुद्धा केले.जरी छत्रपतिशी वितुष्ट आले होते तरी सुद्धा संताजिने मोग्लंशी संगर्ष चालूच ठेवला. मराठ्यांच्या यदाविच्या बातम्या जुल्फिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अर्काट बाहेर काडली पण संताजी पुन्हा अर्काट दिशेनी येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला. पुढे संताजी कृष्णपट्टाम लूटले, मोगल सैन्य बघ्याची भूमिका घेत होते. नंतर संताजिने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांचा शोकांतिकेची सुरवात झाली. राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजिचे सैनिक पुन्हा राजरामांस जाउन मिलू लागले. हीच संधी साधून धनाजीने संताजिवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला. संताजी असह्य होउन आपल्या घराकडे निघून गेला. आता मोगल सैन्य सुद्धा संताजिच्या मागावर होते.सातारच्या प्रदेशात शंभुमहादेवचा डोंगर रांगात संताजिने आश्रय घेतला होता. शंभुमहादेवचा डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास कुचरत असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढ़ला आहे. या अगोदर मराठयानी याच डोंगर रांगात दबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते.संताजिंच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत. कोणी सांगते की संताजिंस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले. तर कोणी लिहिते की संताजिंस त्याच्याच माणसाने फितुरिने मारले, काहींच्या मते दवेदारानी मारले असे आहे. पण इतिहास जाणकरांच्या मते त्यांस नागोजी मानेने मारले असे आहे.

Wednesday, January 14, 2015

#मराठा_शौर्य_दिन #पानिपत

१४ जानेवारी
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती.सदाशिवराव पेशेव,विश्वासराव,जनकोजी शिंदे,यशवंतराव पवारतुकाजी शिंदे,समशेर बहाद्दर,इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले.१४ जानेवारी १७६१ हे भारताच्याइतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहेमराठा आणि अफगाणीसैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होताकीजगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होतीजर मराठे जिंकले असते तर ना इंग्रजबळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असताकदाचित दिल्लीवर त्याचवेळीमराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतची लढाईमुळे मराठीमानसात न्यूनगंड निर्माण  होतातो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजेतो मराठीजनतेसाठी ऊर्जेचास्फूर्तीचानिस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवाप्रत्यक्ष रणांगणातठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होतीहाएकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहेमराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठीआणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,"बचेंगे तोऔर लढेंगे " असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्यावाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते

"पानिपत १७६१मध्ये श्री.त्रं.शंशेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेलीमहत्वाच गोष्ट ही कीमराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होतेकेवळ लुटारु म्हणुनदुसर्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पणहे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे  तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,यातत्वासाठी मराठे पानीपतास लढले."

गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात

कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!

पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणिचिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ...!!" तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठीलढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडेपाहण्याचे धाडस केले नाही

पानिपतचा समरप्रसंग च्या काही घटना :-


१४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.

युद्धाची सुरवात सकाळी  ते १० च्या दरम्यान झालीगारदीच्या तोफा गरजल्या  समोररस्ता बनविण्याचा प्रयत्न झालामात्रपठाणांवर प्रभाव पडला नाही.

गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले  बर्खुदारखानाचा निभाव लागेना  त्यांचे हजारोंनीसैनिक मरून पडलेगारदीमागे दमाजी गायकवाड  विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले.मात्रजखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.

त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्धलागलेमराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलोअसे वाटूलागले.

दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढलातोफखानाबंद पडून इब्राहिम खान जखमी.

याचवेळी एक गोळी विश्वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडलेभाऊसाहेब घोड्यावरूनदुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.

विश्वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर  शिंदे मागून रणांगण सोडूनमार्ग काढीत दिल्लीकडे निघालेभाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.

दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले.भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविलेपठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नानाफडणीसाने पाहिले.

सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश् झालेयुद्धात  युद्धानंतर एकूण ८० हजारते  लाख मराठे मारले गेले.


युध्दाचे नेतृत्व करणारे "श्रीसदाशिवराव उर्फ भाऊ पेशवेयांना त्रिवार मानाचा मुजरा...
वयाच्या "१८-२०वर्षी रणभूमीत पराक़म गाजवणारया "श्रीविश्वासराव पेशवे", "जणकोजीशिँदेआणि "समशेर बहाद्यरया "शूर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा"...