I,MeMyself

I,MeMyself

Thursday, December 11, 2014

~ २७ वर्षांचा रणसंग्राम ~





ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे स्वराज्यावीर , ज्ञानवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.

टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.

याच छत्रपती संभाजी महाराज. ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.

खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.

संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.

याच छत्रपती संभाजी महाराज.यांचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जिजाऊच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.

उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घर घर पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घर घर पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला पेज तर्फे करण्यात येत आहे.

जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय शंभूराजे



२७ वर्षांचा रणसंग्राम-१
भाग २

एका मराठी माणसाच्या नजरेतून पाहता त्या यावनाधामाला सर्व हरताना पाहून आनंदच होतो. मराठी शौर्याचे गीत गायल्याशिवाय राहवत नाही. पण वरवर कौतुक गाण्यापेक्षा या युद्धामागाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विश्लेषण केल्यास या युद्धाचा निकाल जास्त सुखद व गोड वाटतो. प्रत्येक युद्धामागे काही राजकारण दडलेले असते. किंबहुना युद्ध हे राजकारणातील एक दुधारी अस्त्रच आहे. हे युध्द देखील इतर युद्धांप्रमाणेच एक संपूर्ण भारतीय पातळीचे राजकारण होतं.

समर्थ रामदासांच्या वाक्यांमधून सांगायचं तर शिवरायांनी त्याचं उभं आयुष्य जी “राज्यासाधानेची लगबग” केली होती, त्याचं फळ १७व्य शतकाच्या अखेरच्या २ दशकांमध्ये महाराष्ट्राला मिळालं. महाराजांनी या “महाराष्ट्रराज्याला” व हिंदुत्त्वाला दख्खन मध्ये मूळ धरू दिलं होतं. त्यांच्या “futuristic vision” मधून सह्याद्रीच्या रांगेमध्ये बगलाणापासून कोकणापर्यंत सर्व मुलखात असंख्य गड-कोट बांधले व जुने कोट अजून बलशाली केले. एक भक्कम बचावात्मक कणा निर्माण केला-जो या युद्धामध्ये खूप महत्त्वाचा ठरला. महाराजांनी मराठी आरमार शून्यापासून निर्माण केले. या आरमाराच्या जोरावर महाराज कल्याण पासून कारवारपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणू शकले होते. पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण केले. मराठी आरमार त्या काळी अंजदीव पासून मस्कत पर्यंत भगवे फडकावत गेल्याचे उल्लेख आहेत. याच आरमारामुळे पश्चिम किनार्यावरची जवळपास सर्व महत्त्वाची ठाणी व बंदरे मराठ्यांच्या ताब्यात आली होती. यामुळे दक्षिणेत असलेल्या बादशाह्याना अरबांकडून घोडे व फिरांग्यांकडून तोफा-दारुगोळे आयात करणे कठीण होऊ लागले होते, व बादशाह्याचा व्यापार ठप्प होऊ लागला होता. शिवाजी महाराज कोकणात उतरल्यानंतर आदिलशाहीने त्याचाविरुद्ध अनेक अयशस्वी मोहिमा काढल्या होत्या- त्या सर्व मोहिमांचा एक मुख्य हेतू होता तो म्हणजे मराठ्यांना या सागरी किनाऱ्यावरून बाहेर काढणे. परंतु या सर्व स्वाऱ्या होऊनदेखील मराठ्यांचं स्वराज्य कमी न होता वाढतंच गेलं.


२७ वर्षांचा रणसंग्राम-१
भाग 3

उत्तरेकडे मुघली सत्तेला सर्वात मोठा धोका होता तो म्हणजे राजपुतांचा. अनेक शूर राव-राणे यांनी मुघालांविरुद्ध लढा दिला होता. महाराणाप्रताप त्याच शूर परंपरेतील एक तेजस्वी योद्धा. परंतु अकबर पासून मुघलांनी राजपुतांना उच्च पदव्या द्यायला सुरुवात केली व त्यांना आपल्या बाजूने करून घेतले. म्हणा राणाप्रतापांसारखे काही अपवाद होतेच. परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्ण राजस्थान मधील राजपुतांनी मुघलांचे स्वामित्व पत्करले होते. औरंगजेबाने आपल्या वृद्ध बापाला कैदेत टाकून व स्वतःच्या थोरल्या भावाला ठार करून सिंहासन प्राप्त केले होते. कवी भूषण या सर्व प्रकारचं वर्णन करताना म्हणतात:

“किबले की थोर बाप बादशाह शाहजहाँ टाको कैद कियो मान मक्के आग लाई है
बड़ोभाई दाराको पकरी के मार डार्यो मेहरहो नहीं माँ को नहीं सगा भाई है
बंधू तो मुरादबक्ष बादी चुग करिबे को बीचले कुरान खुदा की कसम खाई है
भूषण सुकवि कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हें तेऊ पादशाही पाई है |”


२७ वर्षांचा रणसंग्राम-१
भाग 4

औरंगजेबाच्या सत्तेखाली राजपूत जवळपास पूर्णतः शांत झाले होते. उत्तर भारतातील हिंदुंच शेवटचं आश्रयस्थळ मुघलांनी काबीज केलं होतं. त्या धर्मवेड्या औरंगजेबाला आता आड येत होते ते फक्त सीख, मराठे व बुंदेलखंड. औरंगजेब आयुष्यभर धर्मवेडाच होता. हुंदुंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करण्यात त्याचा हात होता. काशीविश्वेश्वर, मथुरा, सोमनाथ ही प्रमुख मंदिरे. त्याचा सत्तेमध्ये हिंदूंना जिझिया कर भरायला लागतसे. त्याचप्रमाणे त्यांनी इस्लामी शरीयाची सक्ती लादण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सीखांचे धर्मगुरू गुरु तेघबहादूर यांना इस्लाम मध्ये धर्मांतर करण्यात अपयश आल्यावर औरंगजेबाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली व सीखांविरुद्ध कायमचं वैर निर्माण केले. त्याच्या या दुर्बुद्धीमुळे सिख व राजपूत हे मुघली सत्तेपासून दुरावले गेले व दख्खनेत जे य्द्ध झालं त्यात त्याला या दोघांचा पाठींबा मिळाला नाही.

शिवाजी राजांच्या मृत्युच्यावेळी मराठी राज्याने महाराष्ट्रात भक्कम मूळ धरले होते व महाराष्ट्र, कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पसरले होते. असे असले तरी हिंदवी स्वराज्य चारही बाजूंनी शत्रूच्या विळख्यातच होते. दक्षिणेला आदिलशाही,कोकणात सिद्दी, गोव्यात व बार्देशात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज व पूर्वेला गोलकोंडा ही सर्व संकटस्थळच होती. पण सगळ्यात मोठं संकट उत्तरेकडे असलेल्या मुघलांपासून होतं. १६८१ मध्ये मेवार मधील त्याचा कारभार आटोपून औरंगजेब मराठ्यांविरुद्ध चाल करून आला. त्याचाबरोबर ५०,००,००० सैन्य, तोफखाना, हत्ती, घोडदळ, उंट, सगळं होतं. मराठी सैन्य सर्वमिळून १५,००,००० असेल. त्याचबरोबर मुघलांकडे युद्ध सुरु ठेवण्यासाठी मुबलख खजिना होता. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाह व कुतुबशहा यांची मदत घेऊन औरंगजेबाने मराठ्यांना सर्व बाजूंनी कोंडलं होतं. परंतु २७ वर्ष झुंजून देखील तो त्यांना हरवण्यात अपयशी ठरला.


२७ वर्षांचा रणसंग्राम-१
भाग 5

शिवाजी महाराजांचं एका बखरीमध्ये वाक्य आहे. हे बेडेकरांच्या cassette मध्ये सांगितले आहे. राजे म्हणतात “आज हजरतीस साडेतीनशे दुर्ग आहेत. एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल. मी माझा एक एक दुर्ग त्या आलमगीराविरुद्ध एक एक वर्ष लढवीन. त्या आलमगीरास अवघी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षांचे आयुष्य लागेल!” हा स्वातंत्र्य मंत्र महाराजांनी इथल्या जनतेच्या मनात रुजवला होता. या स्वतान्त्र्यप्रेरक मंत्रामुळेच महाराष्ट्र स्वतंत्र राहू शकला. याचं एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे औरंगजेबाने नाशिक जवळ असलेल्या “रामसेज” या किल्ल्यावरचे आक्रमण. रामसेज हा छोटा दुर्ग व त्यावरील जास्तीतजास्त ५०० सैनिक औरंगजेबाच्या ५००००च्या फौजेविरुद्ध साडेपाच वर्ष झुंजले. एक छोटा किल्ला घ्यायला ज्याला इतका वेळ लागला, तो ३५० वर्षात दख्खन कशी काय काबीज करू शकला असता!!


२७ वर्षांचा रणसंग्राम-१
भाग 6

थोडक्यात सांगायचं झालं तर १६८१ साली औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्याच्या अगमनापासूनच या युद्धाची सुरवात झाली. दख्खनेत अतुल्य जीवहानी व आर्थिक नुकसान झाले. पूर्ण जगाला अस्चार्याचे धक्के देत मराठे फक्त या वादळाला सामोरेच नाही गेले, तर त्यातून सुखरूप बाहेर देखील आले. आपलं स्वातंत्र्य टिकण्याची फुटक्या कवडी एवढा योग असताना सर्व जगाला चकित करेल असा निर्णायक निकाल या युद्धाच्या अंती लागला. सर्व बाजूंनी कमकुवत असलेल्या मराठ्यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जिद्दीने लढा दिला व जिंकला. युद्ध संपल्यानंतर मराठे भारत जिंकायला मोकळे झाले व नंतर अटकेपर्यंत भगवा फडकला.


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग १- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

१६८० मध्ये शिवरायांचा मृत्य झाला, त्या नंतर रायगडावर काही काळ सत्तेसाठीचे राजकारण सुरु होते. सोयराबाई व संभाजी राजे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला की पुढचा छत्रपती संभाजी का राजाराम. अखेर सोयराबाईचा सख्खा भाऊ- सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पाठींबा मिळाल्यावर शंभू राजांचे वर्चस्व ठरले व ते महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले. समर्थ रामदासांनी राजांना एक पत्र लिहिलं. या पत्रात एका राजानी काय केले पाहिजे हे दिले आहे, त्याचप्रमाणे शिवरायांना आदरस्थानी मानून सभाजीराजनी राज्यकारभार कसा केला पाहिजे असे पत्रात दिले आहे.समर्थ म्हणतात:

अखंड सावधान असावें| दुश्चित कदापि नासावें|
तजवीज करीत बसावें| एकांत स्थळी||१||
कांही उग्र स्थिती सोडावी| कांही सौम्यता धरावी|
चिंता परी लागावी| अंतर्यामीं||२||
मागील अपराध क्षमा करावे| कारभारी हाती धरावे|
सुखी करुनी सोडावे| कामाकडे||३|||
पाणवठी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना|
तैसें जनाच्या मना| कळलें पाहिजें||४||
जनाचा प्रवाह चालीला|म्हणजे कार्यभाग आटोपला|
जन ठाई ठाई तुंबला| म्हणिजेतें खोटें||५||
श्रेष्ठीं जें जें मिळविलें| त्यासाठी भांडत बैसलें|
तरी मग जाणावें फावलें| गळीमासी||६||
ऐसें सहसा करू नयें| दोघे भांडे तिसऱ्यासी जाये|
धीर धरुनी म्हत्कार्ये| समजुनी करावें||७||
आधीच पडिली धास्ती| मग कार्यभाग होत नास्ती|
या कारणे समस्तीं| बुद्धी शोधावी||८||
राजीं राखता जग| मग कार्यभाराची लगबग|
ऐसें जाणुनियां सांग| समाधान करावें||९||
सकळ लोक एक करावे| गनीम नीपटूनि काढावे|
येणें करिता कीर्ती धावे| दिगंतरी||१०||
आधीं गाजवावें तडाके| तरी मग भूमंडळ धाके|
ऐसे न करिता धक्के| राज्यास होती||११||
समयप्रसंग ओळखावा| राग निपटूनि काढावा|
आला तरी कळो न द्यावा| जागामाजी||१२||
राज्यामधे सकळ लोक| सलगी देऊन करावे सेवक|
लोकांचे मनामधे धाक| उपजो चि नयें||१३||
बहुत लोक मिळवावे|एकविचारें करावें|
कष्ट करुनी घासारावें| म्लेंच्छावारी||१४||
आहे जितुके जतन करावें|पुढें आणिक मिळवावें|
महाराष्ट्र राज्य करावें| जिकडें तिकडें||१५||
लोकीं हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी|
चढती वाढती पदवी| पावाल तेणें||१६||
शिवरायास आठवावें| जीवित तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी राहावे| कीर्तिरूपे||१७||
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||१८||
शिवरायाचे कैसे बोलणे| शिवरायाचे कैसे चालणे|
शिवरायाची सलगी देणें|कैसी असे||१९||
सकळ सुखाचा त्याग| करूनि साधिजे तो योग|
राज्यसाधानेची लगबग| कैसी केली||२०||
त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणवावे पुरुष|
या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१||


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग २- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

हे पत्र वाचून शंभू राजे प्रेरित होऊन "महाराजांनी जे केले, तेच आम्हाला करायचे" असं म्हणून औरंगजेबाविरुद्ध पुढची ९ वर्ष धुमाकूळ मांडला. या पुढे या "धुमाकुळाचे" वर्णन करायचा एक प्रयत्न.

१६८१ साली सिद्द्यांचा धोका कायमचा काढून टाकण्यासाठी शंभूराजांनी जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला, पण फितुरी मुळे तो अयशस्वी ठरला. याच काळात औरंगजेबाचा सरदार हुसैन अली खान हा उत्तर कोकणात उतरला होता. संभाजी जंजिरा सोडून हुसैन अली च्या मागे गेला व त्याला कोकणातून उठवून पार अहमदनगर पर्यंत मागे ढकलला. ही मोहीम संपेपर्यंत १६८२ चा पावसाला सुरु झाला होता. पावसामुळे दोनही आघाड्या युद्धाच्या बाबतीत शांतच होत्या. पण औरंगजेब राजनीती खेळत होता. त्याने पोर्तुगीजांशी हातमिळवणी करून गोव्यामध्ये मोगली आरमाराला उतरता यावं यासाठी करार केला. हे झाल्यास मुघलांना एक नवीन रसदपुरवठामार्ग मिळेल व ते मराठी मुलुखात खोलवर वर करू शकतील हे जाणून शंभूराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम काढली. त्यांनी जवळपास गोवा काबीज केला होता-पण तेवढ्यात उत्तरेकडे पुन्हा मोगली हल्ले सुरु झाल्यामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. परंतु त्यांनी पोर्तुगीजांना कायमची धास्ती दिली व त्यांच्याबरोबर करार करून त्यांना या युद्धामधून बाहेर केले.


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग ३- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

१६८३मधे औरंगजेबाने आपला मुक्काम अहमदनगरला हलविला, त्याच्या सेनेचे दोन तुकड्यांमधे विभाजन केले. एका तुकडीचा सेनापती होता शहजादा शहा आलम, तर दुसऱ्या तुकडीचा सेनापती होता शहजादा आझम शहा. पहिल्या तुकडीची मोहीम होती ती म्हणजे उत्तर कर्नाटकातून गोव्यामार्गे दक्षिण कोकणात प्रवेश करणे, तर दुसऱ्या तुकडीची मोहीम होती- खानदेशातून मराठ्यांना हाकलून उत्तर कोकणात प्रवेश करणे. दोनही तुकड्या कोकणात एकत्र येऊन मराठ्यांभोवती विळखा घालून त्यांना एकांगी करणार असा बेत होता. या मोहिमेची सुरुवात तर चांगली झाली. शहा अलमच्या हाताखालची तुकडी कृष्ण नदी ओलांडून बेळगावात प्रवेशली व तिथून गोवा मार्गे दक्षिण कोकणात. परंतु कोकणात शिरताच ते मराठ्यांच्या तावडीत सापडले. मराठे गनिमी काव्याचा अचूक वापर करून या तुकडीला छळायला लागले. त्यांच्या रसदपुरवठामार्गावर छापे टाकून सर्व रसद जप्त केली. मोगली सैन्याचे खायचे हाल होऊ लागले. माघारी फिरणे कठीण आणि पुढे जाने अशक्य अशा अवस्थेत मुघलांना शरणागती पत्करावी लागली व शहा अलमला पुन्हा अहमदनगर गाठावे लागले. मुघलांचा पहिला विलाख्याचा चा डाव धुळीला मिळाला.





२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग ४- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

१६८४च्य पावसाळ्यानंतर औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीनखान यांनी थेट रायगडावरच हल्ला केला. परंतु रायगडाच्या किल्लेदाराने हा हल्ला फोडून काढला. औरंगजेबाने शहबुद्धीनखानच्या मदतीला खान जेहान ला रवाना केले. परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याचा प्रचंड पराभव केला. याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने शहाबुद्दीनखानावर पाचाड येथे हल्ला करून मुघलांचा पूर्ण पराभव केला. १६८५मधे शहा अलम पुन्हा एकदा गोकाक मार्गे दक्षिण कोकणात उतरला. या वेळी सुद्धा त्याच्या सैन्यावर मराठ्यांचे छापे सुरूच राहिले व तो जेरीस येऊन पुन्हा माघारी फिरला. औरंग्जेबाजा मराठ्यांभोवती विळखा टाकण्याचा हा दुसरा प्रयत्न देखील फसला.

एप्रिल १६८५मधे औरंगजेबाने दक्षिणेत मुघल साम्राज्याचा विस्तार करायचे ठरवले, व काही काळ मराठ्यांकडे दुर्लक्ष करून आदिलशाही व कुतुबशाही वर चाल केली. ही दोनही घराणी मुसलमान असली तरी शिया मुसलमान होती, व सुन्नी औरंगजेबाला त्यांचा रागच होता. त्यांनी दोनही राज्यांबारोबारचा आपला करार रद्द करून त्यांच्यावर हल्ला केला. मराठी मुलुखात थोडी शांतता आली होती. याचा फायदा घेत मराठ्यांनी उत्तरेकडे मुसंडी मारून नर्मदेच्या मुखाशी असलेल्या भडोच शहरावर छापा मारून खूप संपत्ती जिंकून आणली. त्यांना गाठायला जे मुघल सैन्य आले होते, त्याला चकवून कमीतकमी नुकसानात मराठे स्वराज्यात दाखल झाले, व गरज असलेला खजिना स्वराज्यात आणला गेला.



७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग ५- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

औरंगजेबाची दक्षिणेतली स्वारी चांगलीच सुरु होती. सप्टेंम्बर १६८६ साली मुघलांनी विजापूर जिंकले व विजापुरी राजा सिकंदर आदिलशहा मोगली कैदेत पडला. गोलकोंड्यावर हल्ला केल्यानंतर युद्धात फारसा रस नसलेल्या कुतुबशहाने मोगलांना खंडणी द्यायचे स्वीकारले.परंतु ही खंडणी मिळाल्या मिळाल्या औरंगजेबाने आपले खरे रंग दाखवीत कुतुबशाहीवर चाल केली. कुतुबशाही राजा अबू हुसैन मुघलांच्या हाती सापडला व मुघलांनी त्याला कैद केले. मुघलांच्या या आदिलशाही व कुतुबशाही विरुद्ध च्या लढाया सुरु असताना मराठ्यांनी मैसुरच्या राजाला आपल्या बाजूने फिरवायचा प्रयत्न केला. पेशवे मोरोपंत यांची बंधू केसोपंत हे बोलणी करत होते. परंतु विजापूरच्या पराभवानंतर चित्र पालटले व मैसुरनी मराठ्यांबरोबर यायला नकार दिला. हा धक्का बसला असला तरी शंभू राजांनी अनेक विजापुरी सरदार आपल्या सेनेमध्ये भरती करून आपली सेना वाढवली.


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग ६- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

विजापूर व गोलकोंडा विरुद्धच्या मोहिमा उरकून औरंगजेबाने आपले लक्ष पुन्हा एकदा मराठ्यांवर रोखले. संपूर्ण दख्खन काबीज करायला आता फक्त मराठ्यांना हरवायचं होतं. औरंगजेबाला शंभूराजांविरुद्ध निर्णायक विजय कधीच मिळाला नव्हता. परंतु १६८८च्य डिसेंबरमध्ये त्याला प्रचंड यश मिळाले. खुद्द शंभूराजे संगमेश्वर जवळ पकडले गेले. मराठ्यांच्या छत्रपतीलाच मुघलांनी पकडलंय म्हणल्यावर या विजयाने औरंगजेब पराकोटीचा खुश झाला. त्यांनी शंभूराजांना इस्लाम मधे धर्मांतर करायला सांगितले. पण शंभूराजे एका सिंहाचे पुत्र होते. या बादशाहला मुजरा करायला हा काही आमचा बाप नाही! लायकी तरी आहे का त्याची की त्याला मुजरा करावा! कोणालाही न जुमानणाऱ्या शंभूराजांनी औरंगजेबाचे काहीही ऐकले नाही- उलट त्याचाच अपमान केला. त्यांचा मृत्यु आता अटळ झाला होता. पण औरंगजेबाने त्यांना सोपं मरण मिळू दिलं नाही. हाल हाल करून शंभू राजांना मारले. डोळ्यामध्ये गरम सळया घालून त्यांचे डोळे काढण्यात आले. जीभ कापली व खूप छळ केला. डिसेंबर मध्ये पकडले गेल्यानंतर साधारण मार्च-एप्रिल पर्यंत त्यांचे हे हाल सुरु होते. औरंगजेबाने राजांना मारायचा दिवस ठरवला होता. त्या प्रमाणे फाल्गुन वाद्य अमावास्येला शंभूराजांना वाढू-कोरेगावच्या छावणीत आणण्यात आले. मारेकरी टपलेच होते. औरंगजेबाने इशारा केल्याकेल्या त्यांच्या तलवारी शाभूराजांच्या देहावर कोसळल्या. त्याचं मस्तक मारण्यात आले. देहाचे तुकडे करून कोल्ह्यांना व कुत्र्यांना खायला देण्यात आले. दुसऱ्या दिवशी असतो गुढी पाडवा. आपण घराघरात गुढ्या उभारून नव्या वर्षाचे स्वागत करतो. औरंगजेबाने राजांना ठार करून मराठी जनतेला जणू सांगितलं- उद्या गुढ्या उभारता ना? मग तुमच्या राजाच्या मस्तकाच्याच गुढ्या उभारा! असा क्रूर होता हा औरंगजेब! या असुरा विरुद्ध शंभूराजांनी ९ वर्ष कडवी झुंज दिली हे आपण कोणीही विसरता कामा नये. धर्मांतर करून जगणे शक्य असताना राजांनी मृत्युला पसंती दिली व बेडर पणाने मृत्युला जणू आलिंगनच दिले! राजे धर्मवीर म्हणूनच आहेत!


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग ७- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

संभाजी राजांचे एक कौतुक करावेसे वाटते. त्यांनी औरंगजेबाचा एक मंडलिक राजा व्हायचे नाकारले. मृत्यला सामोरे गेले, म्हणून पुढे १८ वर्ष औरंगजेबाला दक्षिणेत थांबावे लागले. याचाच फायदा घेत उत्तरेत राजस्थान, पंजाब व बुंदेलखंड इथे राजपूत, सिख व महाराजा छत्रसाल यांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारून नवीन स्वधर्माची राज्ये निर्माण केली. संभाजी राजांच्या मृत्युमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर पूर्ण भारतात हिंदुत्त्वाची ज्योत पेटवली गेली.


२७ वर्षांचा रणसंग्राम-२

(भाग 8- युद्धाची पार्श्वभूमी)

संभाजी राजे:

पण आपल्या राजाला अशा प्रकारे मारलेला पाहून इकडची जनता चौताळली. गार पडलेय धोंड्यांवर शाभूराजांच्या रक्ताचे कण उडाले व या गार पडलेल्या धोंड्याचे लाव्हा रसातच जणू रूपांतर झाले. या वेळी मुघलांविरुद्ध खड्ग उचलेले नाही, तर आपल्या पदरी पण हाच मृत्यु हे लोकांना कळून चुकले. एकेका घरातून एक एक तलवार स्वराज्याच्या बचावासाठी बाहेर आली. रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी, शंकराजी नारायण व इतर कित्येक शूर एकत्र येऊन मुघलांशी झुंज सुरु ठेवायचा निर्णय कायम ठेवला. सर्व तहाच्या चर्चा माघारी घेतल्या. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली पुढे ११ वर्ष औरंगजेबाशी सातत्याने लढले. याला कारणीभूत होते ते म्हणजे शंभूराजे. त्याची धन्यता एका खऱ्या योद्ध्यालाच कळू शकेल! शत्रूशी झुंजायला जिद्द व हेतू मिळाला.



२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग १

३२४ वर्षांपूर्वी फाल्गुन अमावस्या या तिथीला आपल्या छत्रपतीची दिल्लीपती औरंग्जेबानी छळून छळून हत्या केली होती. आधी म्हण ल्याप्रमाणेच शंभू राजांच्या मृत्यूचा प्रभाव अवघ्या हिंदुस्थानावर झाला. केवळ त्यांनी इस्लामच नाकारला नाही, तर औरंगजेबाचा मांडलिक राजा व्हायचे पण नाकारले. त्यांचा मृत्यू झाला हे महाराष्ट्रासाठी खरोखर दुर्दैवाच, पण आपल्या प्राणाची आहुती देताना शंभूराजांनी एक नक्की केले- औरंगझेबाला दक्षिणेत थांबणे भाग पाडले. पुढे १८ वर्ष तो व्यर्थपणे मराठ्यांशी झुंजत राहिला, ज्या मुळे तो पूर्णतः बुडाला व अवघा हिंदुस्थान मराठी साम्राज्यात आणावयास मोकळा झाला. तो कालखंड जरी वेगळा असला, तरी तो आला, याचे श्रेय फक्त आणि फक्त संभाजी राजांना त्यांच्या बेडर मृत्युमुळेच!


२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग २

युद्धात भावनांना जसे स्थान नाही, तसेच आपल्या शत्रूची ताकद आपल्यापेक्षा कमी असली की तो संपला, या फाजील आत्मविश्वासाला देखील कोणतेही स्थान नाही. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानाने हीच चूक केली होती. पुढे गर्विष्ठ मोगली सरदारांनी अनेकदा याची प्रात्यक्षिके दाखवली. प्रतापगडला काय झाले हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण संभाजी राजांच्या मृत्यू नंतर खुद्द औरंगजेबाने हीच चूक केली. मराठा छत्रपतीची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती पाहून मराठ्यांचा धीर खचेल असे औरंगजेबास वाटले. परंतु, संभाजी राजांच्या मृत्यूमुळे गडबडून न जाता मराठे अजूनच अधिक त्वेषाने त्या म्लेंच्छासुरावर तुटून पडले. हेच त्या २७ वर्षाच्या युद्धाचे पुढचे धगधगते सुवर्णकळस!


२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग ३

राजांच्या मृत्युनंतर रायगडावर येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठी सेनानींची एक बैठक झाली ज्यामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे,हणमंते, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ चिटणीस, रामचंद्रपंत अमात्य ही पुढे गाजलेली मात्तबर नावे एकत्र आली. एकच निर्णय घेण्यात आला. मुघलांविरुद्धचे युद्ध कायम ठेवायचे! पुढच्या छात्रापातीचा जेव्हा प्रश्न उत्पन्न झाला तेव्हा शिवाजी राजांचे धाकटे चिरंजीव राजारामराजे, यांनी राज्यासाठी स्वतः सिंहासनावर बसण्यास नकार दिला, व शाम्भूराजांचा पुत्र, शिवाजी(शाहू) यांस छत्रपती बनवून आपण स्वतः त्या राज्याचे एक सेनानी झाले!



२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग ४

औरंगजेबाने असद खान या आपल्या सरदाराला दारूगोळ्यासकट रायगड वर हल्ला करायला धाडले. याचा सामना करायला संताजी व रामचंद्रपंत यांनी एक विलाक्ष्ण युक्ती काढली. धनाजी आपल्या फौजेनिशी फलटणला तळ ठोकून मुघलांना गनिमी काव्याची झुंज देत स्वतःकडे ओढणार. त्यादरम्यान संताजी, विठोजी चव्हाण व इतर २००० स्वार खुद्द त्या आलमगीराच्या छावणीवरच छापा मारणार शक्य झाल्यास त्या यावनाधमाला कैद करणार! काय ते धाडस! ठरल्याप्रमाणे संताजीची तुकडी तुळापुरला असलेल्या मोगली छावणीवर तुटून पडली. औरंगझेबाच्या स्वतःच्या तंबूचे सोन्याचे कळस मराठ्यांनी उपटले व लुटले. त्याची बरीच खाजगी सेना व अंगरक्षक कापले गेले. त्या बादशाहच्या सुदैवाने तो त्याच्या नेहमीच्या तंबूत नव्हता, नाहीतर संताजीच्या हाती मारला गेला असता! आपल्या राजाचा सूड घ्यायला हे खरंच फार चांगले झाले असते, पण आपल्याहती विधात्याने या दैत्याचा आणखी छळ लिहिला होता म्हणूनच तो वाचला! दरम्यान धनाजीने असद खानाला स्वतःकडे ओढले व त्याचा पूर्ण पराभव करून दारुगोळा व इतर सामग्री जप्त केली!

मराठ्यांसाठी हा छापा फार निर्णायक होता. आपण खुद्द बादशाहला पण पळवून लाऊ शकतो हे सिद्ध करणारा होता. परंतु या सकारात्मक प्रसंगाबरोबरच एक फार वाईट घटना घडली. सूर्याजी पिसाळ- या रायगडावरच्या किल्लेदारणी फितुरी करून किल्ला मुघलांच्या हवाली केला! महाराणी येसूबाई व शाहू राजे मोगलांच्या कैदेत पडले! काय ही फितुरी! महाराष्ट्राला खरोखर काही मागे खेचत असेल, तर ति अशाप्रकारची फितुरी! आज देखील ३५० वर्षानंतर आपले नेते हेच करतात!(असो! न बोललेलेच बरे!)



२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग ५

रायगड जेव्हा पडला त्या वेळी राजाराम महाराज पन्हाळ्यावर होते. लवकरच रायगड जिंकणाऱ्या मोगली सरदारचे झुलफिकर खानचे पन्हाळगडाला मोर्चे लागले.तिथून निसटून राजे विशालगडास गेले. पन्हाळगड मात्र मोगलांना सर करता येत नाही हे पाहून खुद्द औरंगझेब तिथे दाखल झाला. कडवी झुंज दिल्यावर पन्हाळा शरण आला. मराठी सरदारांना मुघलांचा पुढचा मोर्चा विशालगडाला लागणार हे स्पष्ट झाल्यावर राजाराम महाराजांना त्यांनी जिंजी गाठण्यास सल्ला दिला. जिंजी हा तामिळनाडू मधला बलाढ्य किल्ला पुढची ७ वर्ष महाराष्ट्राची राजधानी होता! राजाराम महाराज विशालगडाहून वेषांतर करून बिदनूर, बंगळूर, या मार्गे जिंजीस पोहोचले. जाताना रामचंद्रपंत यांना हुकुमत पान्हा ही पदवी देऊन दख्खनचा कारभार सांभाळायला सांगितला. खंडो बल्लाळ व हरिजी महाडिक यांच्या सहाय्याने राजांनी सेना, सेनानी व राजकारणी गोळा केले व मोगलांविरुद्ध एक नवी आघाडी उघडली, जी मागे वळून पाहता मोगलांना चांगलीच महागाची ठरली.


२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग ६

राजाराम महाराज पळून गेल्याने औरंगजेब भयानक वैतागला, कारण तो एका गोत्यात सापडला. स्वतः उठून जिंजीवर चाल करायची म्हणजे दख्खन मराठ्यांना धुमाकूळ घालायला मोकळी, आणि गेलो नाही, तर दक्षिणेतून दुसरी मराठी आघाडी उभी राहत्ये! यातून सुटण्यासाठी औरंगजेबाने बरीच फौज आपल्याबरोबर दख्खनेत ठेऊन एक छोटी फौज जिंजीला रवाना केली. परंतु संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सेनेस पुरून उरले. आधी त्यांनी जिंजीस जाणाऱ्या मोगली फौजेचा पराभव केला व नंतर रामचंद्रपंत, व इतर सरदारांना दख्खनेत येऊन मिळाले.



२७ वर्षांचा रणसंग्राम. भाग ३.
भाग ७

रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी, संताजी आणि धनाजी यांनी पुढच्या मोहिमा आखल्या. औरंगजेबानी दख्खनचे चार महत्त्वाचे दुर्ग जिंकले होते- रायगड, पन्हाळा, विशालगड व राजगड यांचा त्यात समावेश होता. तसेच तो झुल्फिकर खान याला जिंजीला वेढा घालायला पाठवत होता. मराठी योजने प्रमाणे संताजी व धनाजी पूर्वेकडे मोगलांना विस्कळीत करणार. बाकी सरदारांनी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात जितके किल्ले शक्क्य असतील तितके जिंकायचे. याने मोगली राज्याचे २ भाग होणार होते, व त्यांचे काम अधिकच अवघड होणार होते. शिवाजी राजांच्या दूरदृष्टीमुळे कल्याण ते कारवर ही संपूर्ण किनारपट्टी मराठी नाविकांकडे होती. त्यामुळे जमिनीवरचे रसदपुरवठ्याचे मार्ग एकदा जिंकले की दक्षिणेत मोगलांची कोंडी होणार होती.


Sunday, June 29, 2014

– किल्ल्यावर जावंच कशाला?



– किल्ल्यावर जावंच कशाला?




या प्रश्नाला उत्तर एकच, “किल्ले आहेत म्हणुन तेथे
जावं.” पण त्याहीपेक्षा महत्वाचं
म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-
अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं
अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य
आहे. पण
तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी.
नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज,
माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन
ओहोरलेली टाकी. पण हीच ती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र
ताठ मानेने वावरले आहेत.
जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने
आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे
आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन
आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण
त्याची किंमत..? अर भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं
गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय
जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह
अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क
आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य
त्या सत्तांध – धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले
होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये
ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच. पण
महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले
भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रं
आहेत.
ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत.
आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत.
अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे
युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले
गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे
किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने
त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर
होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले
ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत
व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे
मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले.
काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण
घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे
इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !

- साद सह्याद्रीची… भटकंती किल्ल्यांची —
श्री. प्र. के. घाणेकर

Sunday, June 22, 2014

!!! विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल !!!

विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली ..!!
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी ...!!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ...!!!

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली ...!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू
माउली ...!!!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २
चालतो तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा !!

टाळ घोषांतुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा ...!!!
दाटला मेघ तू सावळा , मस्तकी चंदनाचा टिळा
लेउनी तुळशीमाळा गळा या पाहसी वाट त्या राउळा

आज हारपले देहभान जीव झाला पुरा बावळा
पाहण्याला तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली ...!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू
माउली ...!!!

माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २

विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल

चालला गजर ... जाहलो अधीर ... लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला ...

देखिल कळस ... डोईला तुळस ... दावितो चंद्रभागेसी ...
सामिपही दिसे पंढरी... याच मंदिरी... माउली माझी ...

मुखदर्शन व्हावे आता । तू सकळ जगाचा त्राता
घे कुशीत या माउली तुझ्या पायरी ठेवितो माथा ...

माउली माउली माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली माउली माउली माउली

पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ...
 श्री नामदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय !!!




Monday, May 26, 2014

ओढ रायगडाची ………. शिवतीर्थ रायगड....

ओढ रायगडाची ……….

आस्तेकदम... आस्तेकदम...
आस्तेकदम... महाराज.....
गडपती... गजपती... भूपती..
अष्टावधानजागृत...
अष्टप्रधानवेष्टित...
न्यायालंकारभूषित...
शस्त्रास्त्रशासत्रपारंगत...
राजश्रियाविराजित..
सकळकुळमंडळीत...
राजनीतीधुरंधर..
प्रौढप्रतापपुरंदर..
क्षत्रियकुलावतंस...
सिंहासनाधीश्वर..
महाराजाधिराज....
राजा....
शिवछत्रपती महाराज......






ओढ रायगडाची. . .
ओढ भगव्याची . . .
ओढ भगव्या रुबाबाची. . .
ओढ भगवा घेऊन नाचायची. . .
ओढ नंग्या तलवारी नाचवायची. . .
ओढ ढोल ताशांच्या गजरांची. . .
ओढ ताश्यांच्या तडाख्याची . . .
ओढ राज्याच्या सुवर्ण रुपाची . . .
ओढ राज्यांच्या धाडसी नजरेची. . .
ओढ राजांना डोळे भरून पाहायची. . .
ओढ राज्यांच्या चरण स्पर्शांची. . .
ओढ राज्यांच्या आशीर्वादाची. . .
ओढ जय शिवराय जयघोषाची . . . ओढ फक्त
आणि फक्त शिवरायांची...

शिवराज्याभिषेक दिन चिरायु होवो

Monday, May 19, 2014

माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची :- अप्पा परब






हाकेसरशी प्राणांचे मोल देणारे मावळे शिवाजीमहाराजांनी तयार केले. किल्ल्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या रूपाने आजही त्यांच्यातील काही जण अस्तित्व राखून आहेत. अप्पा परब नावाचा अवलिया त्यांपैकीच एक. तहान-भूक, नोकरी-व्यवसाय यांची तमा न बाळगता किल्ल्यांच्या वाऱ्या करत इतिहासावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या अप्पांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत....
प्रत्येक मराठी माणसाची नाळ भावनिकरीत्या छत्रपती शिवाजीमहाराज, रायगड व सह्याद्रीशी जडलेली असतेच. कोणाला बालवयात, तर कोणाला प्रौढ वयात ती उमगते इतकेच. तर, अप्पांचा संबंध सह्याद्री व इतिहासाशी कसा व कधी आला? अप्पा सांगतात, 'अगदी लहानपणापासून मला शिवाजीमहाराज व किल्ल्यांचे आकर्षण होतेच. पाचवीत असताना वयाच्या दहाव्या वर्षी मी वडिलांकडून पाच रुपये मागून घेतले. तेव्हा एसटीचे पुण्याचे तिकीट ३ रुपये १२ आणे होते. मी पुण्याला गेलो व सिंहगड पाहिला. येताना ट्रेनने परत आलो'. वयाच्या दहाव्या वर्षी पाहिलेला सिंहगड जणू अप्पांच्या जीवनक्रमाची सिंहगर्जनाच ठरली.
इतिहास, महाराज व किल्ले यांची पुस्तके वाचत आणि जमेल तेव्हा, जमेल तसे कधी एकटेच, कधी सोबतीने अप्पा किल्ल्यांकडे धाव घेऊ लागले. त्यांच्यातील संकलक आकार घेऊ लागला. पण, इतिहासाच्या वाटेवरील वारकर्‍यांना निखार्‍यांचीच वाट चालावी लागते, याचा प्रत्यय अप्पांना १९७० मध्ये आला. एका इतिहासकाराने नवोदित इतिहासकारांसाठी मार्गदर्शक संस्था काढण्याचा त्यांचा सल्ला निव्वळ नाकारला नाही, तर सपशेल झिडकारला. अप्पांनी तगमग होऊ न देता उलट प्रेरित होऊन संकलक होण्याचा ठाम निश्‍चय केला. स्वत:ला सोसावी लागलेली उपेक्षा इतर इतिहास अभ्यासकांना सोसावी लागू नये, यासाठी माहिती संकलित करण्याचा त्यांनी सपाटा लावला. जो कोणी इतिहास किंवा किल्लेप्रेमी वा अभ्यासक अप्पांकडे येतो, त्याला अप्पा आपल्या ज्ञानाचे व अनुभवाचे भांडार उघडून देतात.
हळूहळू अप्पांसोबत ट्रेक करणार्‍या सह्यवेड्या तरुणाईचा ओघ वाढत गेला. अप्पांसोबत ट्रेक म्हणजे पर्वणीच. ट्रेकर्स अप्पांसोबत रानवाटा, घाटरस्ते, सभोवतालचा परिसर व किल्ल्यांच्या इतिहासाची ओळख करून घेत व तृप्त होत. काही वर्षे अशीच गेल्यावर पुढे अप्पांवर एक संकट कोसळले. अप्पा ज्या गिरणीत कामाला होते, ती गिरणीच बंद पडली. पण, ज्या पद्धतीने सह्याद्री असे असंख्य वज्र घाव झेलत दमदारपणे उभा आहे, अगदी त्याच पद्धतीने अप्पांनी या संकटाला न डगमगता तोंड दिले. अप्पा दादरच्या फूटपाथवर पुस्तके व कॅलेंडर विकून चरितार्थ चालवू लागले. संकटाचे रूपांतर त्यांनी संधीत केले. व्यवसायाला धरून त्यांचे वाचन व लेखन होऊ लागले. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी अनुराधा बाळकृष्ण परब यांची मोलाची साथ मिळाली. ट्रेकर्स व इतिहासप्रेमी त्यांना 'माई' म्हणून ओळखतात. इतिहासवेड्या अप्पांशी त्यांची सप्तपदी झाली व संसारातून वेळ काढून जमेल तसे, जमेल तेव्हा त्या अप्पांची सोबत करू लागल्या. अश्‍चर्य म्हणजे या वयातही अप्पांसोबत जमेल तसे माई गडकिल्ल्यांवर जातात.
१९८० पासून अप्पांमधील वक्त्याला व मार्गदर्शकाला चांगला वाव मिळाला. एका छायाचित्रकार मित्राच्या किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनानिमित्ताने अप्पा बोलू लागले आणि पुढे श्रोते ऐकू लागले, ते आजतागायत ऐकत आहेत. अप्पांना किल्लेदर्शनासाठी व वक्ता म्हणून निमंत्रणे येऊ लागली. पण, शक्यतो गडकिल्ल्यांवरच बोलण्याचा आग्रह असे. तेही काहीही मानधन न घेता. कुणी मानधनासाठी आग्रह केलाच, तर 'ही छत्रपती शिवाजीमहाराजांची दौलत आहे. मी ती उधळतोय. त्याचे कसले आले मानधन?', हे अप्पांचे उत्तर असते.
८० चे दशक अप्पांना मिळालेल्या धमक्यांनीही गाजले. अप्पांच्या शास्त्रशुद्ध संकलन व निष्पक्षपाती मांडणीमुळे प्रस्थापितांना धक्का बसला. इतिहासाच्या खुणांची भूगोलाशी सांगड घालत अप्पांनी मांडलेले मुद्दे प्रचलित समज—गैरसमजांना प्रश्न करणारे होते. त्यांचे तर्कशुद्ध विेषण व कारणमीमांसा यांवर चर्चा रंगू लागल्या. त्यांच्या किल्लेदर्शनाच्या वार्‍यांना खीळ घालण्याचे प्रयत्न होऊ लागले. पण, नव्या पिढीतील विचारवंत, ट्रेकर्सनी अप्पांची कास धरली व ते विचार करू लागले.
अप्पांचे लेख 'जिद्द' त्रैमासिकात येऊ लागले. ते गाजले. पुढे ते मासिक झाले व तब्बल २० वर्षे अप्पा 'जिद्द'मधून लिहीत राहिले. पुढे २००० च्या सुमारास अप्पांनी मासिकात लिखाण थांबवले. अप्पांच्या पन्हाळा —विशाळगड वार्षिक वारीतील सहभाग व त्या ऐतिहासिक घटनेवरील माहितीसत्रे गाजली. इथेच ते ट्रेकर्स ग्रुपच्या गळ्यातील ताईत बनले. याच दरम्यान समीर वारेकर नामक व्यक्ती अप्पांना काही मार्गदर्शनासाठी भेटली. अप्पांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने व विचाराने भारावून त्यांनी अप्पांची संकलने पुस्तक स्वरूपात छापण्याचा मानस बोलून दाखवला. पण, अप्पांनी अट घातली, 'अगदी छापील किमतीत, फक्त प्रिंटर म्हणून तोटा सहन करावा लागणार नाही, इतक्या अल्प मोबदल्यात पुस्तके विक्रीस आणायची.'
'बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरेंसारख्या असंख्य सरदार—मावळ्यांनी प्राणांचे मोल देऊन राखलेल्या छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगण्यासाठी मी पैसे घेऊ?' असा रोख सवाल विचारत अप्पांनी 'ना नफा, ना तोटा' तत्वावर पुस्तके बाजारात आणली आणि इतिहास व दुर्गप्रेमींना बौद्धिक मेजवानीचा अखंड लाभ मिळाला. मनाची श्रीमंती काय असते, याचा प्रत्यय अप्पांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला येतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आप्पा परब.
तशी अप्पांची ऐतिहासिक नाण्यांवरही हुकुमत. या आवडीविषयी आप्पा सांगतात, 'पाचवीत असताना मी गावी गोव्याला गेलो होतो. तिथे जुगार खेळण्यासाठी देशी-विदेशी लोक यायचे. लोक जुगारात हरले, की निरनिराळ्या चलनातील नाणी व काही वेळा आंग्लकालीन व मुघल-मराठेकालीन नाणी जिंकलेल्या व्यक्तीला देत असत. मी ती नाणी पाहण्यासाठी कुतूहलापोटी जात असे. एकदा आईने पहिले व दरडवले. पण, नाण्यांच्या अभ्यासासाठी मी तिथे उभा राहतो, हे कळल्यावर आईने तिच्याजवळील नाणी मला दिली व माझा छंद वाढीला लागला.' आप्पा मराठेशाहीतील, तसेच पर्शियन मुघल नाण्यांवर अधिकाराने बोलतात. पण, संग्रह करण्याइतपत अप्पांची परिस्थिती नव्हती. अनेक व्यक्ती व नाणीतज्ञ अप्पांकडे मार्गदर्शनासाठी येतात. मार्गदर्शन पुन्हा विनामुल्यच.
अप्पाना कुणीही व्यक्ती भेटली, कि पहिले ते त्या व्यक्तीचे नाव विचारतात. त्यापुढील दहा मिनिटे त्या व्यक्तीच्या आडनावाचा उगम, इतिहास व भूगोल सांगतात. टी व्यक्ती तत्क्षणी अप्पांची होऊन जाते. इतिहासाचा अभ्यास करता करता त्यात उल्लेखलेली घराणी, मग त्यांचा इतिहास व उगम या बाबतीत आपसूकच अप्पांचा हातखंडा बसला.
सत्कारांपासून आप्पा कायम लांबच राहिले. 'माझ्याकडे संस्था येतात, त्या वार्षिक संमेलनं, हारतुरे सत्कार करण्यासाठी किंवा भाषणासाठी. पण, काही भरीव कामगिरी करून इतिहासाच्या ज्ञानकोशात भर घालण्यासाठी येणाऱ्या संस्था विरळच. मला या सत्कारांमध्ये रस नाही. दुर्दैव महाराष्ट्राचे, कि अधिकांश संस्थांचे कार्य वार्षिक संमेलन भरवण्यापुरतेच मर्यादित राहते,' असे सांगताना अप्पांच्या चेहऱ्यावरची खंत व कळकळ स्पष्टपणे जाणवते.
रायगडावर रोप-वे चा प्रकल्प घोषित झालं, तेव्हा आप्पा उपोषणाला बसले. अप्पांचे म्हणणे होते, की रोप-वेमुळे रायगडचा पिकनिक स्पॉट होईल. आज काही प्रमाणात का होईना, त्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा त्यांना बोलावून घेतले होते. बाळासाहेबांचे म्हणणे पडले, कि रोप-वेमुले वृद्धांची सोय होईल. त्यावर आप्पा म्हणाले, 'रायगड पाहण्यासाठी म्हातारपणाची वाट का पाहावी? प्रत्येक मराठी माणसाने तरुणपणीच रायगड पाहावा. आपल्या मुलांना लहानपणी रायगडदर्शन घडवावे, जेणेकरून इतिहास व संस्कृतीबाबत संवेदनशील पिढी तयार होईल.' बाळासाहेबांनी शाबासकीची थाप देत हसत हसत निरोप घेतला.
'अलीकडेच लंडन येथील "हाउस ऑफ कॉमन्स' येथे सचित्र शिवचरित्राचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ते ब्रिटनच्या लोकसभेत प्रकाशित झाले म्हणून इंग्रजी माध्यमांनी दाखल घेतली. एरवी इंग्रजी माध्यमे शिवाजीमहाराज अथवा मराठ्यांची दाखल घेत नाहीत. याचे कारण मराठी माणसात एकी नाही. शिवाजीमहाराज राष्ट्रीय पुरुष. त्यांना आपण महाराष्ट्रापुरते, मराठी भाषेपुरते व जातीयवादात अडकवून ठेवले. हा त्या राजर्षीचा अपमान आहे,' आप्पा बोलू लागले, की केवळ ऐकत राहावे.
नव्या पिढीकडून अप्पांना काय अपेक्षा आहेत? 'आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व साधने सोयी उपलब्ध असताना तरुण पिढीने पुरातत्व विभागात व पुराभिलेख विभागात संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोकऱ्या कराव्यात. इतिहासाचे प्राध्यापक होऊन नोकऱ्या कराव्यात. आपण शिवछत्रपतींचे देणे लागतो. त्यातून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न करावा,' असे ते सांगतात. अप्पांनी आपली मुलगी शिल्पा परब-प्रधान हिलाही त्याच तालमीत वाढवले. ट्रेकर्सची 'शिल्पाताई' इतिहासात पद्युत्तर आहे व अप्पांचा वारसा पुढे चालवत आहे.
आयुष्याच्या खडतर वाटेवर जागोजागी काटेरी निवडूंग सर्रास पहावयास मिळतात. मात्र, अशाच खडकाळ वाटेवर एखादे सोनचाफ्याचे झाडही बहरते, डवरते व इतर अनेकांची आयुष्यं सुगंधित करते. आप्पा म्हणजे दुसऱ्या प्रकारात मोडणारे अमृततुल्य व्यक्तिमत्व. आप्पा कधी जातीभेद मनात नाहीत. कुठलीही औपचरिक्ता न पाळता अप्पांच्या घरचे दार सर्वांसाठी कायम खुले. 'माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेत मानला नाही, तर मी का मानू?' इथे इतिहासाच्या वारीतील या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची कहाणी सुफळा आली.
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)

Saturday, May 10, 2014

" छत्रपती शिवाजी महाराज कि जय "

छत्रपती शिवाजी महाराज कि ………. म्हणाल्यावर ज्याच्या तोंडी आपसूक " जय " येत तो मराठा……




महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तीला मराठीत गारद म्हाणतात
ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला अल्काब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली म्हाणले जाते
छत्रपती शिवरायांची अल्काब व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात
दुर्गपती - गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे

गज-अश्वपती - असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे
त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं
तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो

भूपती प्रजापती - वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार
हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे

सुवर्णरत्नश्रीपती - नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे शिवरायांच्या बाबती ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती

अष्टावधानजागृत - आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा )

अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत
आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे

न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत (निपूण) असलेले राजे

राजनितीधुरंधर - राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे

प्रौढप्रतापपुरंधर - पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे

क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे

सिंहासनाधिश्वर - जसा देव्हार्यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती

महाराजाधिराज - सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सार्या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजा

राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे शिवराय

मुजरा.......राजं..........मुजरा....../




राजश्रिया विराजित सकळगुणमंडळीत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिँहासनाधीश्वर हिंदवी  स्वराज्य संस्थापक भोसलेकुलदीपक,  मुघलदल संहारक, कीर्तिवंत, बुद्धिवंत , राजाधिराज योगीराज, दुर्गपती,गज-अश्वपती,भूपती प्रजापती,राजनितीधुरंधर ,
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत ,अष्टावधानजागृत,न्यायालंकारमंडीत,सुवर्णरत्नश्रीपती श्रीमंत श्री  श्री   श्री  छत्रपती शिवाजी महाराज कि जय



रा घो 

Monday, April 28, 2014

#२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला



बाजीराव पेशवा पहिला 

समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे

हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविनाऱ्या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने
चालविणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे आजच्या दिवशी निधन झाले.
बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरलापुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि सहदिशांना मराठा सत्तेच्या नौबती वाजविणाऱ्या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तुत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेल्या लढाया, पालखेडची लढाई, डभई व भोपळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने.
चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुस्तद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला.
मर्द त्या मराठी फौजा । रणकीर्ति जयांच्या गाव्या ।
तळहाती शिर घेवुनिया, चालुनि तटावर जाव्या ।
जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहाळास बिलगाव्या ।
अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करनाऱ्या या प्रतापी बाजीरावांचे निधन दी. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या ४० व्या वर्षी नर्मदाकाठी 'रावेरखेडी' (मध्यप्रदेश) येथे झाला.
जन्माने ब्राह्मण असून देखील क्षात्रधर्म स्वीकारून थोरल्या छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या सीमा रुंदावण्याचे महान कार्य केले; त्या राउंना त्यांच्याच महाराष्ट्रात मात्र फक्त 'मस्तानी' वाला बाजीराव म्हणून आठवले जाते.


रा. घो.