I,MeMyself

I,MeMyself

Monday, April 28, 2014

#२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला



बाजीराव पेशवा पहिला 

समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे

हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविनाऱ्या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने
चालविणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे आजच्या दिवशी निधन झाले.
बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरलापुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि सहदिशांना मराठा सत्तेच्या नौबती वाजविणाऱ्या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तुत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेल्या लढाया, पालखेडची लढाई, डभई व भोपळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने.
चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुस्तद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला.
मर्द त्या मराठी फौजा । रणकीर्ति जयांच्या गाव्या ।
तळहाती शिर घेवुनिया, चालुनि तटावर जाव्या ।
जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहाळास बिलगाव्या ।
अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करनाऱ्या या प्रतापी बाजीरावांचे निधन दी. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या ४० व्या वर्षी नर्मदाकाठी 'रावेरखेडी' (मध्यप्रदेश) येथे झाला.
जन्माने ब्राह्मण असून देखील क्षात्रधर्म स्वीकारून थोरल्या छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या सीमा रुंदावण्याचे महान कार्य केले; त्या राउंना त्यांच्याच महाराष्ट्रात मात्र फक्त 'मस्तानी' वाला बाजीराव म्हणून आठवले जाते.


रा. घो. 









3 comments:

  1. ekadha pustak suggest kar na बाजीराव पेशवा पहिला hyanchyavarcha

    ReplyDelete
  2. 'Peshwekalin Maharashtra' by V.K. Bhave.

    ReplyDelete